ओशाे - गीता-दर्शन

    28-Mar-2023
Total Views |
 
 

Osho 
 
प्रभूंच्या ध्यानासाठी तर अट आहे कीजाे समत्वाला उपलब्ध हाेताे, ज्याचे चित्त निष्कंप हाेते-अशी व्य्नती एकांतात, अंतर्गुहेत प्रभूचं ध्यान करू शकते. मग तिला सगळीकडे ताेच दिसू लागताे. स्वत:चा तर हुडकूनसुद्धा पत्ता लागत नसताे. मग प्रभूच प्रभू दिसू लागताे. त्याचीच स्मृती राेमराेमात गुंजन करू लागते. त्याचाच स्वाद प्राणांच्या काना-काेपऱ्यापर्यंत तरंगत जाताे.राेमा-राेमात त्याचाच सूर वाजू लागताे. श्वासाश्वासात ताेच-तेव्हा ध्यान हाेते.ध्यानाचा अर्थ आहे ज्याच्याशी आपण आत्मसात हाेऊन त्या परमात्म्याशी एक हाेऊन जाऊ. जर तसं नसेल तर ध्यान सेल. जर आपण शिल्लक असाल तर ते ध्यान नाहीये.ध्यानाचा अर्थ आहे आपण ज्याच्याशी एकरूप हाेऊन गेलाे आहेात. ध्यानाचा अर्थ आहे, काेणी तुम्हाला कापलं तर तुमच्या ताेंडून निघावं ‘प्रभूला का कापता आहात?’
 
ध्यानाचा अर्थ आहे जर तुमच्या पायावर काेणी डाेकं ठेवलं तर लक्षात यावं की, प्रभूला नमस्कार केला आहे.असा विचार करायचा असं नाही, तर अंतरी असं जाणावं. तुमचा राेम-राेम प्रभूशी एक व्हावा; पण ही घटना तर एकांतात घडते. इनर अलाेननेस, ती जी अंतरीची एकांत गुहा आहे तिथं, जिथं सगळं जग हरवून जातं. ‘बाहेर’ तिथं समाप्त हाेऊन जातं. मित्र, प्रियजन, शत्रू सगळे सुटून जातात. घर, धनदाैलत सगळं हरवून जातं आणि शेवटच्या टप्प्याला तुम्ही स्वत:ही हरवून जाता, कारण त्या स्वत:ची, आत काहीच जरुरी नसते.त्याची गरज फ्नत बाहेरच पडत असते.जर हे बराेबर समजून घेतलं तर आपण ज्याला ‘मी’ असं म्हणता ताे एक फ्नत साईनबाेर्ड आहे.