पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगी ।।2।।

    24-Mar-2023
Total Views |

saint
जसे त्या तीव्र तापावर अचूक औषध घेतल्याने राेगी बरा हाेताे आणि मग आपाेआपच त्याला हाेणारे भयानक भासही थांबतात. त्याचप्रमाणे शुद्ध ज्ञानाचे औषध घेतले की या मायारूप जगाचा भ्रम समूळ नाश हाेताे, अशा शब्दांना श्रीसमर्थांनी शुद्ध ज्ञानाचे महत्त्व वर्णन केले आहे.वेदांतामध्ये ‘‘अहं ब्रह्मास्मि’’ हे महावाक्य मानतात. सर्व वेदांताचे सार या एका वाक्यात आले आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. दिसणारे हे सर्व चराचर जग म्हणजे त्यातील प्राणी, पक्षी, पशू सर्व माणसे, एवढेच नव्हेतर अचल वस्तू या सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे.या सृष्टीतील मी एक जीव आहे. त्यामुळे माझ्यामध्येही ताे अंश आहे. त्यामुळे मी आणि ही सृष्टी यांना जाेडणारा परम ेश्वरी अंश हा सूत्ररूप धागा आहे. आणि म्हणून मी स्वतःही अंशरूपाने ब्रह्मस्वरूपच आहे. हे चिरंतन सत्य जाणणे म्हणजे शुद्ध ज्ञान प्राप्त हाेणे हाेय, असे साेपेपणाने सांगता येईल.श्रीसमर्थ अद्वैत तत्त्वज्ञानाचेच उपासक हाेते. त्यामुळे सर्व विश्व अद्वैतानेच जाेडलेले आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा हाेती.
 
हज्ञान प्राप्त हाेण्यासाठी शिष्याने लाेकांताचा त्याग करून एकांतात जाऊन बसावे आणि तेथे विवेकाने जगामागील सत्याचा शाेध घ्यावा. अभ्यासपूर्वक असा शाेध तन्मयतेने घेतल्यावर त्याला स्वस्वरूपाचे म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान हाेईल.आपण त्या परमेश्वराचेच अंश आहाेत, ही जाणीव त्याच्या मनात निश्चितपणे दृढ हाेईल, असा विश्वास श्रीसमर्थांनी दिला आहे. या ‘‘शुद्ध ज्ञान निरूपण’’ समासाचा शेवट करताना ते म्हणतात की, या ज्ञानाचे अस्तित्वच माहीत नसलेले, अस्तित्वाची जाणीव हाेऊन त्याची तळमळ उत्पन्न झालेले, त्या तळमळीमुळे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि ती ज्ञानप्राप्ती पूर्णतया झालेले, असे जगामधील माणसांचे चार वर्ग आहेत. त्यांना बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध असे म्हटले जाते. शुद्धज्ञानाची माहिती घेतल्यानंतर आता या पाचव्या दशकातील पुढील चार समासात त्या चारीही वर्गांची लक्षणे आपण ऐकावीत आणि आपणामध्येच प्रगती करावी, असे त्यांचे सांगणे आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299