भूक आणि तहान हे दाेन राेग असतील, तर अन्न आणि पाणी हे त्यावरील उपचार आहेत. भाेजन अवश्य करा; पण भजन करण्यास विसरू नका.मनुष्य विवेकाचा वापर करून औषध घेताे.मग त्याने भाेजनही विवेकानेच केले पाहिजे.पाेटाची भूक भागवा, जिभेची नव्हे. भाेजन करणे पुण्याचे काम आहे; पण जिभेचे चाेचले पुरवणे पाप आहे. अती बाेलण्याने आणि अती खाण्याने जीभ बिघडते. डाेळे म्हणजेच दृष्टी सुधारल्याने मन सुधारते; जीभ सुधारल्याने जीवन सुधारते.