ओशाे - गीता-दर्शन

    24-Mar-2023
Total Views |

Osho
आपणास जे माहिती नाहीये, त्याचं ध्यान आपण करू शकता काय कधी ? आपल्याला ज्याची माहितीच नाही त्याचं ध्यान करणं आपणाला श्नय व्हावं, हे संभव आहे काय? ध्यानासाठी तर जाणणं जरूर आहे. पण आपण सारे प्रभूंचं ध्यान करताे. आणि आपणास प्रभूचा काही ठावठिकाणा नाही. ज्याचा आपणास काही ठाव नाही, ज्याला आपण जाणलं नाही, त्याचं ध्यान कसं हाेऊ शकतं? ताे आहे की नाही हे पण अजून समजलेलं नाही.असला तर कसा आहे हेही ठाऊक नाही.ज्याची काही वार्ताच नाही त्याचं ध्यान हे लाेक करत आहेत. लाेक बसून, डाेळे बंद करून राहतात, अन् म्हणतात, आम्ही प्रभूचं ध्यान करताे आहाेत. जर त्यांच्या डाे्नयाला एखादी फट पाडता आली, त्यांच्या डाे्नयात थाेडसं डाेकावता आलं, तर कळेल, ते काेणाचं ध्यान करताहेत. काय ते समजेल.
 
नानक एका गावात आलेले आहेत, आणि नानक म्हणत आहेत की काेणी हिंदू नाही, न् कवाेणी मुसलमानही नाही. तेव्हा गावचा मुसलमान नबाब नाराज झाला. त्याने म्हटले, ‘बाेलवा रे त्या फकीराला, काेणी मुसलमान नसतं, काेणी हिंदू नसतं म्हणताेय. ही हिम्मत त्याची ?’ नानक आले. त्यांना नबाबाने विचारले, ‘काेणी हिंदु नसताे, काेणी मुसलमान नसताे असं तुम्ही म्हणता मग तुम्ही काेण आहात?’ यावर नानकांनी म्हटले,- मी खूप शाेधलं. खूप म्हणजे खूपच. चामडी, हाड, मांस, मज्जा, येथपर्यंत तर मला वाटलं की, मी हिंदूही असू शकताे अन् मुसलमानही. पण तिथपर्यंतच मी नव्हताे. मी जेव्हा त्याच्या पलिकडे गेलाे, तेव्हा मात्र असं दिसलं की, तिथे काेणी हिंदू-मुसलमान नाही.