अनेकवेळा प्रयत्न करूनही किंवा अनेक संधी देऊनही जर एखादा व्यक्ति त्याचे दुष्कृत्य साेडतच नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच याेग्य असते. अशा हट्टी लाेकांना शिक्षेशिवाय पर्याय नसताे. अशांना शिक्षा दिली नाही तर यांचे दुष्कृत्य वाढतच जाते. म्हणून कायद्यानुसार शिक्षा हाेण्यासाठी पुढाकार घेणे आपले कर्तव्य ठरते.महाराजांनी ताेंडावर थुंकण्याची भाषा केली असली तरी आपण प्रत्यक्षरित्या एखाद्याच्या ताेंडावर थुंकावे हे महाराजांना अपेक्षित नाही. अशा दुष्टांच्या ताेंडाकडे सुध्दा पाहू नये तसेच अशा दृष्टांचा सहवासही लाभू नये, एवढेच येथे अपेक्षित आहे, असे लाेक नरकयातनभाेगतील तेव्हा भाेगतील पण आज हे लाेक यांच्या दुष्कृत्यामुळे अनेकांना नरकयातना भाेगायला लावतात.त्यामुळे अशांच्या ताेंडावर थुंकण्यासाठी म्हणजेच याेग्य ती शिक्षा देण्यासाठी अशांना कायदा दाखविणे ही आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी असेल. ही जबाबदारी ज्ञानाेबा-तुकाेबांच्या भक्तांनी कायदा हातात न घेता सकारात्मक दृष्टीकाेनातून पार पाडली तर एक प्रकारचे सामाजिक ऋण फेडल्यासारखे हाेईल. जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448