बिघडण्याचेसुद्धा दाेन प्रकार असतात. एक प्रकार जाे आपली किंमत कमी करताे आणि दुसरा ताे जाे आपली किंमत आणखी उंचावर नेऊन ठेवताे. उदाहरणादाखल, दुधात विरजण टाकल्यावर त्याचे दही बनते. लाेकांच्या दृष्टीने दुधात बिघाड झाला; पण त्याची किंमत वाढली ना ! दुसरीकडे दुधात मिठाचा खडा टाकल्यावर त्याच दुधाची किंमत घटली. याचप्रकारे, साेनं आणि पितळेचा रंग सारखाच असताे, पण साेन्याच्या रसात पितळेचा रस ओतल्यास साेन्याच्या रसाची किंमत कमी हाेते.