4. समदर्शी - ते चराचरात, कणाकणात सर्व प्राणिमात्रांत देव पाहतात.रवींद्रनाथ टागाेरांसारखे विश्वबंधुत्त्वाला मानणारे देवाला ‘दरिद्रीनारायण’ म्हणतात. संत एकनाथांसारखे कावडीतील तीर्थ तहानेल्या गाढवाला पाजतात. त्यानेच त्यांच्या तीर्थयात्रेचे ‘मावंदे’ (संपूर्ण) हाेते.
बाेध : ‘भाव ताेचि देव.’ जशी ज्याची दृष्टी, तसा त्याचा देव.