गीतेच्या गाभाऱ्यात

    23-Mar-2023
Total Views |
 
 
पत्र नववे
 

Bhagvatgita 
 
पाश्चात्य पंडितांची मते दाेन्ही बाजूंची आहेत.सखाेल अभ्यास केला म्हणजे असे दिसेल की, वैदिक काळाच्या आरंभी आर्य व दस्यु असे दाेनच वर्ण हाेते. पुढे आर्यांच्यामध्ये तीन भाग निर्माण झाले व त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय. वैश्य असे मानू लागले व दस्यूना शूद्र समजू लागले.ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार जाती झाल्या आणि असे दिसते की, वेदकाळ संपण्यापूर्वी या चार जातींशिवाय आणखी कितीतरी जाती निर्माण झाल्या हाेत्या. स्मृतीकाळाकडे आपण नजर दिली व निरनिराळ्या स्मृती पाहिल्या की, आपणास असे दिसते की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार मुख्य जातीशिवाय या जातीतील मिश्र विवाहामुळे स्मृतीकाळी 60 पाेटजाती निर्माण झाल्या हाेत्या. मनुस्मृतीच्या 10 व्या अध्यायावर टीका करताना मेधा-तिथीने असे म्हटले आहे की, चार मुख्य जाती व साठ पाेटजाती यांतील मिश्रविवाहामुळे आता खूप जाती निर्माण झाल्या आहेत.
 
1931 चा खानेसुमारीचा रिपाेर्ट पहिला म्हणजे असे दिसते की, हिंदूंच्या मध्ये ज्यांच्यात बेटीव्यवहार हाेत नाही, अशा 2400 जाती आहेत.आपल्या जातीयवादामध्ये विषारी तत्त्व जर काेणते असेल, तर जात जन्मावर अवलंबून असणे हे हाेय. आपण पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर असे दिसते की, जात जन्मावर अवलंबून नसून गुणावर अवलंबून आहे. पतंजलीच्या महाभाष्यात असे म्हटले आहे की, ताप, ज्ञान व जन्म यामुळे ब्राह्मण प्राप्त हाेते. व तप-ज्ञान नसेल, तर जन्माने ब्राह्मण असलेला मनुष्य खरा ब्राह्मण नव्हे.‘‘तप: श्रुतं च याेनिश्च एतद् ब्राह्मणकारकम्’’ ‘‘तप: श्रुताभ्यां याे हीनाे जाति ब्राह्मण एव स:।’’ (पातंजल महाभाष्य 2-2-6) महाभारतातील शांतीपर्व व बनपर्व यामध्ये जातीयवादाबद्दल जे विचार आले आहेत त्यावरून तुला असे दिसले की, एखाद्या ब्राह्मणाच्या अंगी ब्राह्मणाचे गुण नसून शूद्राचे गुण असतील, तर ताे शूद्र हाेय. व एखाद्या शूद्राच्या अंगी ब्राह्मणाचे गुण असतील तर ताे ब्राह्मण हाेय.
 
‘‘ यस्तु शूद्राे दमे सत्ये धर्मे च सतताेस्थित:। तं ब्राह्मणमहं मन्ये वृत्तेन हि भवेत् द्विज:।। वनपर्व 216-18-15 शांतीपर्व 189-4-188-10 यावरून तुला समजून येईल की, जात जन्मावर अवलंबून असते. हे तत्त्व आपल्या हिंदूधर्मातील जातीयवादाची विषारी नांगी हाेय. जात जन्मावर अवलंबून नसून गुणावर अवलंबून आहे, असा पूर्वीच्या ग्रंथांचा आधार घेऊन आपण म्हणू लागलाे की, ही विषारी नांगी आपाेआप मारली जाईल.गीता वाचून तू असे लक्षात ठेव की मनुष्य काेणत्या जातीत जन्मला याला किंमत नसून, त्याच्या अंगी काेणते गुण आहेत याला किंमत आहे.गीतेच्या सांगण्याप्रमाणे ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे.तू विचारतेस की, आपण सुखाेपभाेग घेत असताे अशा वेळी आत्मदृष्टीची गुरुकिल्ली काेणती? तुला एक गाेष्ट सांगताे? ब्रह्मदेशाचाराजा थिबा हा आत्मज्ञानाविषयी राजा जनकाप्रमाणे प्रसिद्ध हाेता.एका रात्री एक अहंकारी साधू त्याच्याकडे आला. राजाने त्याचा आदरसत्कार केला.