ओशाे - गीता-दर्शन

    20-Mar-2023
Total Views |
 
 
Osho
आपल्या असण्याच्या शैलीवर अवलंबून आहे.तर जेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणताे, ताे समत्वाला उपलब्ध झालेला, स्थिर, शांत झालेला पुरुष एकांतात ईश्वराचे ध्यान करीत राहताे, -तेव्हा त्याचा अर्थ काय असेल? कुठे जंगलात, गुहेत, पर्वतावर जाऊन असा असेल? नाही, आणखी एक गुहा आहे, तुमच्या आतील हृदयाची, तेथे तुमच्या हृदयात आणखी एक अरण्य आहे, स्वत:च्या आतच, शून्याचं.
तेथे एक इनरस्पेस, एक आंतरिक आकाश आहे.या बाहेरच्या आकाशापेक्षाही विराट आणि माेठं- हृदयाच्या गुहेत तिथे ताे प्रभूचं ध्यान करताे. अन् प्रभूचं ध्यान तिथंच केलं जाऊ शकतं. बाहेरच्या जंगलात कुणा प्रभूचं ध्यान करता येत नसतं. हे पण जरा समजून घ्या.साधकाच्या दृष्टीने विशेष लक्षात घेण्याजाेगी गाेष्ट म्हणजे प्रभूचे ध्यान हृदयाच्या गुहेत, अंतर्गुहेतच केलं जातं.
 
दगड फाेडून न्नकल म्हणून आपण बाहेर कितीही गुहा बनवल्या तरी त्याच्यानं काहीएक प्रश्न सुटत नसताे. दगड फार दुबळा आहे. हृदयाचं खाेदकाम, दगडाच्या खाेदकामाहून जास्त गुंतागुंतीचं, जास्त अवघड आहे. हिऱ्याच्या छिन्न्याही त्याबाबत निकामी हाेऊन जातील.हृदयात गुहा आहे. सर्वांच्या आत एक अंतराकाश आहे. एक आंग्ल भारतीय विचारवंत आबरी मेनन यांनी एक छाेटंसं पुस्तक लिहिलं आहे. त्यांचे वडील भारतीय हाेते आणि आई इंग्रज हाेती. आबरी मेनननी एक छाेटंस पुस्तक लिहिलं आहे, ‘द स्पेस ऑफ दि इनर हार्ट’.आंतर हृदयाचं आकाश. ते पुस्तक एका अतिशय मधुर आठवणीने सुरू केलंय.