देह हा परमार्थाचे साधन समजावा

    20-Mar-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
संताचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून साेडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे, हे नव्हे. जाे जाे परमार्थाला लागावे ताे ताे देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरिता उपयाेगी पडताे, पण ताे कितीही चांगला आणि उपयाेगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही, त्याप्रमाणे देहाचेही आहे.आतल्या खाेबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करंवटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे.पण मनुष्य ‘हा देहच मी आहे,’ असे मानून व्यवहार करताे. वास्तविक आपण देहापासून निराळे आहेत असे पदाेपदी दाखवीत असताे; ‘माझा’ हात, ‘माझा’ पाय, ‘माझा’ डाेळा, ‘माझे’ मन, ार तर काय, ‘माझा’ जीव असेही म्हणताे; पण वागताे मात्र ‘मी ताेच आहे’ असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल, असेच आपण भगवंताजवळ मागताे; असे न करावे. आपल्या देहावरचे प्रेम कमी हाेण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागताे.
 
कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागताे. म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्गुरूच खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट हाेईल तसतशी सद्गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ हाेत जाईल तसतसे आपण स्वतःला विसरून जाताे आणि आपण देहाच्या पलीकडे गेलाे म्हणजे सद्गुरूची खरी ओळख हाेईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा माेठा ज्ञानीसुद्धा हेवा करताे.? ‘मी देह’ म्हणावे यापलीकडे दुसरे अज्ञान काेणतेही नाही.मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खाेटे नाही. प्रपंचात संकटे येतात, तरी पण ताे साेडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती काेणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत देहाचे ममत्व थाेडे कमी हाेते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे हाेताे, नाम ाच्या सहवासाने नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे आपण परमात्म्याचे हाेऊ.