गीतेच्या गाभाऱ्यात

    20-Mar-2023
Total Views |
 
 
पत्र नववे
 

Bhagvatgita 
 
तुला असे वाटणे साहजिकच आहे. कितीतरी लाेक परमार्थातील पाेपटपंची करतात; पण लाेकांना काही कळत नाही.तुला एक उदाहरण सांगताे म्हणजे तुला बरीचशी कल्पना येईल.तुला माहीत आहे की, पूर्वी पृथ्वी अस्तित्वात नव्हती.सूर्यापासून एक छाेटासा भाग अलग झाला आणि पृथ्वी तयार झाली. पृथ्वीवर जड व चेतन पदार्थ हे सूर्याचेच अंश आहेत, असे म्हणता येईल. पृथ्वी व तिच्यावरील पदार्थ जरी सूर्यापासून असले, तरी सूर्य नसेल, तर त्यांना प्रकाश नाही, सूर्यच पृथ्वीवरील जड व चेतन पदार्थांना प्रकाश देताे.हा वैज्ञानिक भाग तू लक्षात घे. सूर्यापासून पृथ्वी झाली व सूर्य पृथ्वीवरील जड व चेतन पदार्थांना प्रकाश देताे याबद्दल वाद नाही. ज्ञानी लाेक असे म्हणतात की, अगदी आरंभाला ब्रह्म हाेते व त्या ब्रह्मापासून सर्व जग (जड व चेतन) निर्माण झाले. ते पुढे असे म्हणतात की, सारे जग ब्रह्म आहे व ब्रह्मच ब्रह्माला प्रकाशित करते.
 
आता तुला थाेडासा या बाबतीत प्रकाश पडेल.तू विचारतेस की, गीतेचे सार काेणत्या अध्यायात आहे? गीतेचे सार काेणत्या अध्यायात आहे याबद्दल वाद आहे.नुसता वाद नाही तर विवाददेखील आहे. इतकेच काय पण त्याबाबतीत प्रवादसुद्धा आहे. हे वाद, विवाद-प्रवाद पाहून लवाद नेमला तर निकाल असा द्यावा लागेल की, महाभारताचे सार गीतेत आहे व गीतेचे सार नवव्या अध्यांयात आहे.
आकाशाला उपमा आकाशाचीच. सागराला उपमा सागराचीच.त्याप्रमाणे 9 व्या अध्यायास उपमा 9 व्या अध्यायाचीच!गीतेचा पाया ज्ञान आहे. गीतेचे मंदिर कर्माने बांधले आहे आणि त्या मंदिराचा कळस भ्नती आहे. गीतेचे तात्पर्य ज्ञान, का कर्म, का भ्नती याबद्दल तज्ज्ञ खुशाल वाद कराेत, पण ज्याला गीतेचे श्रीखंड चाखावयाचे आहे ताे म्हणेल की, कर्माच्या दुधाने, ज्ञानाच्या साखरेने व भ्नतीच्या केशराने बनलेले श्रीखंड म्हणजे गीतेचे श्रीखंड! तू म्हणतेस की, गीता वाचून व स्वत: विचार करून आणि रामायण पाहून म. गांधींनी रामराज्याची कल्पना मांडली
 
याबाबतीत तू काही प्रश्न विचारले आहेस. त्या प्रश्नाची उत्तरे अशी.All evils of the world cease when kings would become philosophers and philosophers would become kings.जेव्हा राजे तत्त्वज्ञानी हाेतील व तत्त्वज्ञानी राजे हाेतील, तेव्हा जगातील सारे अमंगल नाहीसे हाेतील.प्रभु रामचंद्र खरे तत्त्वज्ञानी हाेते, म्हणूनच ते राम-राज्य प्रस्थापित करू शकले. आपण राम-राज्याची भाषा बाेलताे पण त्यासाठी असे हाेणे आवश्यक आहे की, राजसत्ता हाती असणारे लाेक स्वार्थी नसता खरे तत्त्वज्ञानी असले पाहिजेत.लाेक म्हणतात की, आपण ग्राम-राज्य स्थापन केले म्हणजे राम-राज्य निर्माण हाेईल. ग्राम-राज्यांतून ‘‘ग’’ (गर्व) जाेपर्यंत जात नाही ताेपर्यंत राम-राज्य कसे स्थापन हाेणार? रावणाला आपण अत्यंत दुष्ट म्हणताे; पण त्या रावणापेक्षाही हल्लीच्या काळाचे काही लाेक जास्त दुष्ट आहेत. रावणाने सीतेला पळवून नेण्याचा दुष्टपणा केला; पण तिच्यावर बलात्कार करण्याचा दुष्टपणा केला नाही.