वाच्यार्थ: अभ्यासाशिवाय शास्त्र, अजीर्ण झाल्यास भाेजन, गरिबाला उपदेश आणि वृद्ध व्यक्तीसाठी तरुणी विषवत आहेत.
भावार्थ : चांगल्या गाेष्टीसुद्धा काही वेळेस नकाेशा (कटू) वाटतात.
1. शास्त्राचा अभ्यास - वाचन, पठण, मनन, चिंतन केल्याशिवाय शास्त्र समजत नाही.करत अभ्यासके जडमति हाेत सुजाण’, असे रहीम म्हणतात. आज आपण सर्वत्र पाहताे विद्यार्थी म्हणवणारे परीक्षार्थी असतात, विद्यार्थी नव्हे. फक्त डिग्री मिळविण्यासाठी ते शिकतात.निरक्षर लाेकांसाठी तर ‘काला अक्षर म्हैसबराबर’ असते. त्यांना बसच्या पाट्या वाचता येत नाहीत; कधीकधी उलट्या दिशेच्या गाडीतही ते बसतात व फजिती करून घेतात. म्हणूनच अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कारण अभ्यासाशिवाय शास्त्र विषवत असते.