गीतेच्या गाभाऱ्यात

    02-Mar-2023
Total Views |
 
 
पत्र सहावे
 

Bhagvatgita 
 
या अर्थाने बाेलावयाचे झाल्यास हल्लीचे युग हे ध्नका देणारे युग आहे.राजकारणात हल्ली जिकडे-तिकडे ध्नके बसतातच आहेत. विज्ञान प्रांतातदेखील ध्नका देण्याचे काम चालू आहे.साैरग्रहमालेतील दुसऱ्या काेणत्याही ग्रहावर अथवा उपग्रहावर मानव वस्ती नाही, हे आता मानवाला कळून चुकले आहे. परंतु साैरग्रहमालेत पृथ्वीशिवाय अन्यत्र मानवप्राणी काेठेही नसला तरी अब्जावधी तारका आकाशात चहूकडे विखुरल्या आहेत.आणि त्यापैकी अनेकांना ग्रहमाला लाभलेल्या आहेत. या ग्रहमालेतून पृथ्वीसारखे मानव प्राण्यासाठी याेग्य असे ग्रह असू शकतील, असे वैज्ञानिक म्हणत आहेत.आपण जेव्हा काही वर्षांपूर्वी अंतराळात उड्डाण करू लागलाे, तेव्हा पिंजऱ्यातील पाेपटाला पिंजऱ्याबाहेर काढल्यावर जसा आनंद व्हावा तसा आनंद वैज्ञानिकांना झाला.
आपल्या अग्निबाणांना प्रत्येक सेकंदाला 7 मैल गती देऊन आपण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ताेडून टाकले. आता वैज्ञानिक म्हणत आहेत की, आपल्या अग्निबाणांना प्रत्येक सेकंदाला 11 मैल गती दिली तर आपण सूर्याचेसुद्धा गुरुत्वाकर्षण ताेडून टाकू व सूर्य ग्रहमालेच्या बाहेर जाऊ शकू आणि मग दुसऱ्या ग्रहांतील मानवाचा आपणास तपास लागेल.राजकारण, विज्ञान यात असे ध्नके बसत आहेत, तसेच अध्यात्मातदेखील बसत आहेत.अध्यात्म प्रांतातील एका विद्वान व्नत्याने असे म्हटले आहे की, ‘‘मा्नर्सवाद + ईश्वर’’ हा माझा विचार आहे. विचारकांचे काम प्रयाेग करण्याचे नाही. काही अध्यात्मवादी संत प्रयाेग करायला गेले आणि फसले. मी जरीअध्यात्मवादी असलाे तरी स्नतीच्या संतती-नियमनावर माझा विश्वास आहे.गांधीवादाला माझा विराेध आहे. आज अध्यात्मप्रांतात पूर्वीच्या सनातनी विचारांना टाकून देऊन क्रांतिकारक विचार अंगीकारले पाहिजेत.
 
आजचे युग हे ध्न्नयाचे युग आहे. ह्या युगामध्ये गीता वाचूनच तुला खरी मन:शांती मिळेल. तू नुसती गीता वाचू नकाेस तर त्यातील श्नय तितका भाग आचरणात आणण्याचा प्रयत्न कर म्हणजे तू सूखी हाेशील.असे तू लक्षात घे की, देह प्रपंचाला वाहायचा व चित्त हरीला वाहायचे म्हणजे प्रपंचाला परमार्थ हाेताे. आपण लहान हाेण्याची खटपट करावी. लहान हाेणे म्हणजेच माेठं हाेणे.अणाेरणीयान् हाेणे म्हणजेच महताे महीयान् हाेणे, दु:खाची थंडी आली की नामाची बंडी घालावी. मुखी नाम आणि हाती आनन्द असा हा राेकडा व्यवहार आहे. देवाचे नुसते ज्ञान हाेणे प्नवान्नांचे नुसते वर्णन वाचण्याप्रमाणे आहे. प्नवान्नांचे वर्णन वाचून भूक भागत नाही, त्याप्रमाणे देवाचे ज्ञान हाेऊन आनंद मिळत नाही. भूक भागायची असेल तर प्नवान्न ताेंडात घातले पाहिजे. देवाच्या अनुभवाचा रंग भ्नितप्रेमात दंग झाल्याशिवाय मिळत नाही.आजकाल आपण दारूबंदी, सुवर्णबंदी असले शब्द ऐकताे.परमार्थात जी बंदी आहे ती अपेक्षा-बंदी? मनुष्याला वाटते की, सुखाची तेजी असावी व दु:खाची मुदी असावी. त्याने असे लक्षात ठेवावे की, अपेक्षाबंदी म्हणजे सुखाची नांदी व दु:खाची मंदी.