2. गुरुपत्नी : गुरुगृही गुरुपत्नीचा सहवास लाभताे.गुरु विद्या देताे. गुरुपत्नीही मातेसमान काळजी घेते म्हणून तिचाही सन्मान करावा.
3. मित्रपत्नी : मित्राकडे वारंवार जाणे-येणे हाेते. त्याची पत्नीही आपले नीट आदरातिथ्य करते म्हणून तिचाही मातेप्रमाणे आदर करावा.
4. पत्नीमाता : सासूबाई नेहमीच जावयाची खूप काळजी घेतात. जावई खूश तर मुलगी खूश असे जणू समीकरणच आहे. अशा सासूला नेहमी आदर द्यावा, त्यांनाही माताच समजावे.
5. स्वमाता : जन्मदात्री आई किंवा सांभाळणारी आई (जशा देवकी आणि यशाेदा) यांनाही सन्मान द्यावा. कारण आईच आपल्याला घडवते.लहानपणापासून माेठे हाेईपर्यंत आणि माेठे झाल्यानंतरही ती आपल्याला सांभाळते, आपली काळजी घेते.