जे ज्ञान हाेयेंसे भासे । परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसें ।।2।।

    17-Mar-2023
Total Views |
 
 

saint 
सामान्यांना ज्ञान आणि आत्मज्ञान यातील भेद उमगत नाही, म्हणून ताे स्पष्ट करताे असे सांगून श्री समर्थ म्हणतात की विद्या, संगीत, शास्त्र, वैदिक, वैद्यकी, अश्व, गजपरीक्षा, वाहनपरीक्षा, धान्यपरीक्षा, यंत्रपरीक्षा, रत्नपरीक्षा हे सत्य ज्ञान नाही. तसेच प्रत्येक व्यवसायातील म्हणजे भूमीपरीक्षा, भाषाज्ञान, रसज्ञान, फळज्ञान, पुष्पज्ञान, लेखनज्ञान, वक्तृत्वज्ञान, गंधज्ञान, शीघ्रकवित्वज्ञान, नृत्यज्ञान, तालज्ञान, वाद्यज्ञान, चित्रज्ञान, भविष्यज्ञान, मंत्रतंत्रज्ञान, याेगयागज्ञान ही सर्व त्या त्या कलेची किंवा विद्येची ज्ञाने हाेत. पण ते आत्मज्ञान नव्हे.जगामध्ये चाैसष्ट विविध कला, चाैदा विद्या आणि याहीशिवाय सिद्धी व नाना कला आहेत. पण यापैकी काेणतीही कला, विद्या किंवा सिद्धी म्हणजे आत्मज्ञान नव्हे.
 
या प्रत्येक गाेष्टीने आपल्याला ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान झाले असे वाटते पण ताे भ्रम आहे. ज्या ज्ञानाने देहाभिमान व त्यामुळे झालेला विश्वरूपी मायेचा संभ्रम समूळ नष्ट हाेताे आणि परमेश्वरस्वरूप समजते. तेच खरे आत्मज्ञान हाेय आणि ते अर्थातच या विविध मर्यादित ज्ञानाहून वेगळे, स्वतंत्र व व्यापक आहे. तेव्हा या विविध ज्ञानांचा साधनेत काहीही लाभ हाेणार नाही आणि खरे समाधान मिळणार नाही, हे श्राेत्यांनी जाणले पाहिजे.ज्या ज्ञानाने स्वस्वरूपाचे ज्ञान हाेऊन सायुज्ज्यमु्नती प्राप्त हाेते तेच खरे आत्मज्ञान हाेय. असे सांगून श्री समर्थ म्हणतात ते वगळून बहुधा या इतर सर्व ज्ञानप्रकारांनाच भ्रमाने आत्मज्ञान समजण्याची चूक साधकांनी करू नये आणि सावधपणे सत्य आत्मज्ञानाची उपासना करावी.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299