ओशाे - गीता-दर्शन

    17-Mar-2023
Total Views |
 
 

Osho 
जिथ जाल तिथं ती तुमच्याबराेबरच आत हजर असेल. तिथं कुठं झाडाखाली विश्रांतीसाठी थांबाल, तिथं आतले मित्र विचारू लागतील, ‘काय, कसं काय! बरं आहे ना? हवा पाणी काय म्हणतंय?’ सगळं तेथेही चालू हाेईल. तुमच्यासमवेत तुमच्या आत बैठकीचा अड्डा सुरू झालेला असेल.काही वेळा असं हाेईल की ज्यांच्या हजेरीत त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्याबद्दल आणखी तीव्रतेने जाणीव हाेत असते.आपण आपल्या पत्नीजवळ तासभर बसलात तर विसरून जाऊ शकता की ही पत्नी आहे, हे विसरू शकता कितीकदा विसरताच. पत्नी नसते तेव्हा तिची रिकामी जागा तिचं जास्त स्मरण करून देते.
 
एखादा माणूस जिवंत असताना कळतही नाही, पण ताे मरून गेल्यावर त्याची आठवण जास्त येते. जखम हाेते, ती जागा रिकामी हाेते.काेणाच्या असण्यामुळे आपल्या अंतरी गर्दी हाेत नाही, तर आपल्या अंतरीचे जे रस आहेत, त्यांच्यामुळे गर्दी हाेते. ते आंतरिक रस असतात.आपण दुसऱ्यामध्ये रस घेत असताे. म्हणून जेव्हा काेणी हजर असताे तेव्हा त्याची दखल घ्यायची तितकीशी घाई असत नाही. ताे हजर आहे, हे माहीत असतं-वाटतं की, ‘केव्हातरी त्याच्याकडे लक्ष देऊ. पण हजर नाही असं कळलं की जास्त रस घेऊ लागताे. कारण, ज्याच्यात रस घ्यायचा ताे हजर असेल की नसेल हे माहीत नसतं. तेव्हा गैरहजेरी आणखी जास्त पकड घेते, जाेरानं पकड घेते. रवींद्रनाथांनी कुठेतरी थट्टेनं लिहिलं आहे ज्या पती-पत्नींना आपणामधील प्रेम जिवंत ठेवायचं असेल त्यांनी अधूनमधून एक-दुसऱ्यापासून सुट्टी घेत राहावी, हाॅलिडे ठेवावेत.