काेणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी

    16-Mar-2023
Total Views |
 
 
 
Gondavlekar
 
अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा माेठेपणा राखून आपला माेठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. ताे दुसऱ्याला फसविण्याकरिता नसावा.स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने काेणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दाेष सांगणे, हे हीनपणाचे लक्षण आहे. लाैकिकातला माेठेपणा एका जन्माचा घात करताे, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात.द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण काेणाचाही द्वेष करू नये. स्वार्थामुळे द्वेष घडताे, पण स्वार्थ जायला नामाशिवाय दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि माेठेपणा बाळगण्यासाठी नाही.
 
वाचेने म्हणजे जिभेने बाेलता येते आणि खाता येते.नेहमी सत्य आणि गाेड बाेलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते,तिथे नामाची जाेड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणीदेखील भगवंत नव्हता असे नाही; पण कुंपण ार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे, तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे, हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले.अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. ‘मी रामाचा आहे’ असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. ‘नारायणाचे दर्शन व्हावे’ असे नाही प्रल्हाद म्हणाला, ‘नाम नाही साेडणार’ असे म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते; लहानपणात चूक हाेत नाहीच उलट सगळा ायदाच असताे.
 
भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा ुटायचा नाही; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. काेणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपलेच मन गढूळ हाेते. काेणत्याही परिस्थितीत वृत्ती कायम राहणे, हेच याेगाचे सार आहे. ‘माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हाेवाे, पण तुझा विसर मला पडू देऊ नकाेस,’ असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे, ताे तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही.