ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेंविण निरर्थक ।।2।।

    15-Mar-2023
Total Views |
 
 

saint 
अर्थात त्याबद्दल त्यांच्या गुरूची जशी चूक झालेली असते, तशीच चूक साक्षात चतुर्मुखी ब्रह्मदेवानेही केलेली आहे. त्यामुळे सामान्य माणसे ती चूक करतील यात विशेष नाही. म्हणून साधकाने सावधचित्त राहून आपण आत्मज्ञानाच्या मार्गानेच चाललाे आहे ना, हेही पाहिले पाहिजे. सर्व उपदेशात आत्मज्ञानाचा उपदेश सर्वश्रेष्ठ व महत्त्वाचा आहे, असे साक्षात भगवंताने अनेक ठिकाणी सांगितले आहे, असे सांगून श्रीसमर्थ दाेन सूत्रांचा संदर्भ देतात.पहिले सूत्र असे की, पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते खूप असते; पण आत्मज्ञानाने मिळणारे पुण्य त्या स्नानपुण्याची काेटीपट केली तरी त्याहूनही खूप जास्त भरते. म्हणजेच त्या स्नानांच्यापेक्षा आत्मज्ञान काेट्यानुकाेटी फलदायी आहे. दुसरे सूत्र अधिक महत्त्वाचे आणि समर्थासारख्या संतांवर हीनपणे जातीयतेचा मूढ आराेप करणाऱ्यांच्या डाेळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.
 
भगवंत म्हणतात, ‘माणूस काेणत्याही वर्णाचा असाे, जर ताे आत्म ज्ञानास प्राप्त झाला असेल आणि ते ज्ञान त्याच्या ठायीं स्थिरावले असेल, तर मी त्याचा जन्माेजन्मी दास हाेऊन राहीन.म्हणून ते सदासर्वकाळ, सहजपणे जागृत असलेच पाहिजे, असा भगवंताचा आग्रह आहे. थाेडक्यात उपदेशाचे अनेकविध प्रकार असले तरी ज्याच्या पाठीम ागे आत्मज्ञानाची प्रचिती आहे ताेच उपदेश फलदायक ठरणारा आहे, असे सांगून श्रीसमर्थ या उपदेशस्तवन समासाचा उपसंहार करतात आणि अर्थातच साधकाने अशाच उपदेशाचा अंगीकार करावा व त्यायाेगे आपली उन्नती करून घ्यावी, असे सुचवितात.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299