मनुष्यजन्मच का? एका विशिष्ट ठिकाणीच का? वगैरे प्रश्नांची उत्तरे शाेधण्यासाठी जन्मामागील हेतू, अर्थ समजून घ्यावा व सत्कार्य करून जन्म सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम, श्रीकृष्ण यांनी कार्यपूर्ती हाेताच अवतार समाप्ती केली. ज्ञानेश्वरांनीही समाधी घेतली.सामान्य माणसाला एवढे शक्य नाही; पण त्याचा ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हे निश्चित.
6. आपली शक्ती - आपली शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक शक्ती पाहूनच त्याप्रमाणे कार्ये करावीत. क्षमतेबाहेरची, न झेपणारी कामे केल्यास फजिती हाेते, फसवणूकही हाेते, प्रसंगी घातही हाेताे. त्यातून कार्यसिद्धी हाेत नाही ती नाहीच. म्हणून सतत आत्मपरीक्षण करावे.
बाेध : वरील सर्व गाेष्टींचा क्षणाेक्षणी सारासार विचार करूनच आचरण किंवा कार्य करावे.अन्यथा जीवन विफल हाेते.