दिशा सगळियाचि गिळाविया। चांदिणिया चाटूनि घ्याविया। एेंसें वर्तन आहे साविया। लाेलुप्य बा तुझें ।। 11.431

    13-Mar-2023
Total Views |
 
 
 
Dyaneshwari
 
काेणीच काेणाला मारत नाही हा भगवंतांच्या मनातील आशय अर्जुनाला नीट समजला नाही हे भगवंतांनी जाणले. ताे व्यर्थ शाेकाकुल हाेत आहे. अर्जुन भगवंतांना म्हणाला. आकाशामधील ढग नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे दाेन्ही बाजूंची सैन्ये तुझ्या ताेंडात जात आहेत.एकदेखील या अवस्थेतून सुटत नाही. मुकुटासह मस्तके दातांच्या चिमट्यात सापडून त्यांचे पीठ हाेत आहे.मुकुटांवरील रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत. दाढांचे अग्रभागही रत्नांच्या पिठाने माखले आहेत. हे सर्व पाहून अर्जुन म्हणाला, जन्माला येणाऱ्या प्राण्याला दुसरी गतीच नाही काय? सर्व काही या मुखरूपी डाेहात बुडत आहे.ज्याप्रमाणे नद्यांचे समुदाय समुद्रात मिळतात, त्याप्रमाणे हे सर्व जग तुमच्या मुखात जात आहे.
 
तापलेले लाेखंड ज्याप्रमाणे पाण्याला शाेषून टाकते, त्याप्रमाणे भगवंता, तुम्ही सर्व जगाचा ग्रास करीत आहात आणि इतकेही करून तुमची भूक मात्र आवरत नाही. जसा एखादा राेगी तापातून बरा झाल्यावर त्याला खा खा सुटते किंवा दुष्काळातील प्राणी मिळेल ते चाटत बसताे, त्याप्रमाणे तुमची भूक सतत वाढत आहे. तुमच्या मुखापासून काेणाचाच बचाव झालेला नाही.सर्व समुद्रच पिऊन टाकावा किंवा पर्वतच खाऊन टाकावा त्याप्रमाणे हे सर्व विश्व आपण दाढांखाली धरावे हे बरे आहे का? सगळ्या दिशाच गिळून टाकाव्यात किंवा चांदण्या चाटूनपुसून घ्याव्यात, त्याप्रमाणे देवा, आपली हाव वाढलेली दिसते.तुमची ताेंडे सारखी खा खा करत असून त्यांची भूक शमलेली नाही. तुमचे एकच ताेंड वडवानलाप्रमाणे सर्वत्र पसरलेले आहे.