आपणाला देवपण यावचं असं काही नाही. आपणाला देवपणाऐवजी केवळ माणूसपणं आलं तरी पुरेसं आहे. माणूसपण येण्यासाठी नीती-नियमांचे पूर्ण पालन करावे लागते. नीती-नियमांचे पालन म्हटले की ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार आदीला पळवावे लागते. जेव्हा आपल्याकडे ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, स्वार्थ, काम, क्राेध आदीला स्थानच नसते. तेव्हा आपणाला काेणाची फसवणूक करण्याचा, काेणाला लुबाडण्याचा, खाेटारडा मीपणा घेण्याचा विचारच येत नाही. असा विचारही न येणे म्हणजेच ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार, फसवा-फसवी, लुबाडणूक आदीने भरलेला हा खाेटारडा संसार कडू वाटणे हाेय.
संसार कडू वाटू लागला म्हणजे ताे साेडून संन्यासच घ्यावा लागताे असे नाही. संसारात राहून संसारातल्या नकाे त्या गाेष्टीपासून दूर राहणे म्हणजे त्याच्या कडवटपणाची अनुभूती घेणे हाेय. माणूस हाच स्वत:च्या जीवनाचा खरा शिल्पकार असल्याने त्याने स्वत:च निः स्वार्थ प्रेम, समता, बंधुता आदीचे कवचकुंडल पांघरून संसाराच्या कडवटपणाला दूर ठेवायला हवे, असे मला वाटते.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448