देवा विश्वरूप पहावयाचे डाेहाळे। केले तियें पावलाें प्रतिफळें। बापा देखिलासि आतां डाेळे। निवावे तैसे निवाले ।। 11.366

    10-Mar-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
भगवंताचे विश्वरूप किती भयानक आहे याचेच वर्णन अर्जुन अजूनही करीत आहे. ताे म्हणताे की, देवा, तुमची मुखे रागीट आहेत. त्यांनी आपल्या विस्ताराने आकाशास लहान केले आहे.तुझ्या मुखांतील वाांनी अग्निदेखील जळून जाताे. देवा, पाहा ना, तुझ्या मुखातून अग्निच्या ज्वाळा कशा बाहेर पडत आहेत. पुन्हा असे की, देवा, तुमचे एक मुख दुसऱ्या मुखासारखे नाही. त्याचे रंग भिन्नभिन्न आहेत. त्यांच्या अंगांचे तेज एवढे आहे की, ते त्रैलाेक्याचा नाश करील. या तेजालाही अनेक ताेंडे असून त्यांना विक्राळ दात व दाढा आहेत. देवा, हे सर्व पाहा कसे झाले आहे.वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात सापडावावडवाग्नीचा नाश विषाने करावा, अग्निने हालाहल विष प्यावे किंवा प्रत्यक्ष मरणाने मरण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे तुझ्या ह्या संहारात्मक तेजाला मुखे प्राप्त झाली आहेत.
 
ही मुखे एवढी माेठी आहेत की, त्यातील एखादे तुटून पडले तर आकाशास खिंड पडावी. या सर्व ताेंडातून बाहेर पडणाऱ्या जीभांचे वळवळणे सुरू आहे.पाताळातील सर्पाच्या ुत्कारांमुळे त्यांच्या विषाचा ज्वाळा सर्वत्र पसरतात, त्याप्रमाणे या मुखांतील अग्निज्वाला सर्वत्र पसरतात. प्रलयकालीच्या विजांचे समुदाय काढून त्यांचे आकाशात बुरुज उभे राहावेत, त्याप्रमाणे तुमच्या ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टाेके दिसत आहेत.तुमच्या भुवयांच्या अंधारात तुमचे भयानक डाेळे भेडसावीत आहेत. मला आता मृत्यूचे भय वाटू लागले आहे. देवा, विश्वरूप पाहण्याची इच्छा मला झाली हाेती. ती पूर्ण झाल्याने आता माझे चित्त शांत झाले आहे.