4. दारिद्र्य - गरीब माणूस एकटा पडताे, त्याला काेणी जवळ करीत नाही.सतत अभावाचे, उपेक्षेचे जिणे त्याला जगावे लागते. राेजच्या गरजा तर भागत नाहीतच; पण आप्तही त्याला साेडून जातात, मित्रही मिळत नाहीत. मनातले मनातच राहते. गरिबांसाठी सुंदर वस्तू, गाेष्टी, माणसांनी भरलेली जत्रा, जग शून्यवतच असते.
बाेध : अपत्यप्राप्ती, आप्त, बुद्धी, धन आदी गाेष्टीच जीवनात आनंद निर्माण करतात.त्यांच्याशिवाय जिणे व्यर्थ आहे.