सत्ता आणि सत्य काही सहजगत्या मिळत नसते. दाेन्ही गाेष्टी मिळविण्यासाठी तप करावे लागते. सत्ता ही दुसऱ्यांना सतवून मिळते, तर सत्य स्वत:ला तापवून-तप करून मिळते.सत्ता शाश्वत नसते. पण, सत्य शाश्वत असते. सत्ता आणि सत्य या दाेघांच्यात युद्ध हाेते. पण, महाभारतातलेच उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे की, युद्धाच्या 18 व्या दिवशी सत्याचाच विजय झाला हाेता. सत्य हे शब्दांच्या पलीकडचे असते.