ओशाे - गीता-दर्शन

    09-Feb-2023
Total Views |
 
 

OSho 
 
काेणालाही कधीही सगळीच उत्तरे मिळणार नाहीत. जर एखाद्याला अशी सर्व उत्तरं मिळाली तर ती एक धाेकादायक अवस्थाच म्हणावी लागेल. ज्यादिवशी सगळी उत्तरे मिळाली, याचा अर्थ असा हाेईल की परमात्मा सीमित आहे; ताे अनन्त नाहीये, असीम नाहीये. सत्य असीम आहे.त्यामुळे त्याच्याबाबतची सगळी उत्तरे कधीच मिळू शकत नाहीत.आणि सगळीच उत्तरे टेंटेटिव्ह, कामचलाऊ आहेत. उद्या नवे प्रश्न उद्भवतील. आणि सारी उत्तरे विखरून, जातील. न्यूटन जेव्हा एक उत्तर देताे, तेव्हा ते तंताेतंत बराेबर वाटतं. काही वर्षानंतर दुसरा काेणी नवे प्रश्न उभे करताे. आणि न्यूटनची सगळी उत्तरं निरुपयाेगी हाेऊन जातात. मग, आईन्स्टाईन उत्तर देताे, पुन्हा ती जुनी उत्तरं निकामी हाेतात. आता तर दर दाेन वर्षांत उत्तरं अशी निकामी हाेऊ लागतात, नवे प्रश्न उभे राहतात. सगळी जुनी उत्तरं एकदम जमीनदाेस्त हाेतात.
 
प्राैढ माणूस हे जाणून असताे की, सगळी उत्तरे मनुष्याने तयार केलेली असतात आणि स्वतः अस्तित्व निरुत्तर असते. अस्तित्त्व निरुत्तर आहे म्हणून अस्तित्व रहस्य आहे.रहस्य निरुत्तर असतं. त्यातून काेणतंही उत्तर कधीच मिळत नसतं. अल्टिमेट आन्सर, अंतिम उत्तर कुठलेच नाही. धिस इज द आन्सर, बस्स! हे आहे उत्तर, असं काेणीही म्हणू शकत नाही. देअर आर आन्सर्स, बट नाे सर्टन आन्सर. उत्तरे आहेत पण काही एक विशिष्ट उत्तरे असे मात्र नाहीये.बस्स हा प्रश्न अन् हे उत्तर, आता पुनः काही प्रश्न विचारण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं मात्र काेणीच म्हणू शकत नाही. कुतूहल निर्माण हाेतच राहातं...अन् प्रत्येक नवं उत्तर आणखी नव्या प्रश्नाचं कुतूहल निर्माण करून जातं.