चाणक्यनीती

    09-Feb-2023
Total Views |
 

Chanakya 
 
2. नीच व्यक्तीची सेवा - नीच व्यक्ती करुणाहीन, दुष्ट असते.आपल्या सेवकाशी ती माणुसकीने वागत नाही.अमानुष वर्तन करून ती व्यक्ती त्याला छळते म्हणजेच टाेचून बाेलणे, प्रसंगी मारणे, पैसे वेळेवर किंवा अजिबात न देणे इ. गाेष्टी करते. अशावेळी सेवक मानहानीच्या आगीत कायम जळत राहताे.
 
3. वाईट अन्न - शिळे, नासके, उघडे, न पचणारे, अर्धवट शिजलेले, जंतू असलेले अन्न असेल, तर माणसाची पचनक्रिया बिघडते! शिवाय आजारांनाही निमंत्रण दिल्यासारखे हाेते. पुष्कळवेळा विषबाधा हाेऊन मृत्यूही संभवताे.