गीतेच्या गाभाऱ्यात

    09-Feb-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
पत्र तिसरे रामकृष्ण परमहंसांना शेवटी कॅन्सर झाला. लाेकांना फार दु:ख झाले. त्यांचे भ्नत रामकृष्णांना म्हणाले- ‘‘आपण साक्षात्कारी संत. आपणाला कॅन्सरमुळे पराकाष्ठेचा त्रास हाेत आहे. आपण आपल्या दिव्यश्नतीने हा कॅन्सर बरा का करत नाही?’’ रामकृष्ण म्हणाले- ‘‘काेण म्हणताे मला त्रास हाेत आहे म्हणून? मी शरीराच्या व मनाच्या पलीकडे गेलाे आहे. मी खराेखर आनंदी आहे, बिचारे शरीर दु:ख भाेगते आहे. भाेगू द्या. त्याबद्दल काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ तुझा पुढचा प्रश्न मिथ्यावादाबद्दल आहे. काही विद्वान म्हणतात की- ‘‘जग मिथ्या आहे असे भारतीय तत्त्वज्ञान म्हणत असल्यामुळे भारतातील पराक्रमाची खच्ची करण्यात आली आहे. ‘कृण्वन्ताे विश्वमार्यम्’ हा विचार कर्तृत्वाला व पराक्रमाला आव्हान देणारा आहे तर मिथ्यावाद नादानपणाला नि नेभळटपणाला चेतावणी देणारा आहे.
 
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे मिथ्यावाद खरा असेल तर माणसाने चांगले, हाेण्याची खटपट करा हा अट्टहास कशाला? मिथ्यावादामुळेच राष्ट्राचा विचार बाजूला राहिला व आपला ऱ्हास झाला. जग मिथ्या आहे असे सांगणारे तत्त्वज्ञान समाज वर्धिष्णू करत नाही तर समाजाला दुर्बल बनवून त्याचा ऱ्हास करते.’’ परमार्थाच्या प्रांतात एक गाेष्ट सांगण्यात येते ती अशीगुरूने शिष्याला शिकवलेसर्वं खलु इदं ब्रह्म एकदा ताे शिष्य एका जागी बसला असताना तिकडून एक पिसाळलेला हत्ती येत हाेता.हत्तीवर बसलेला माहुत ओरडून सांगत हाेताहत्ती पिसाळलेला आहे. दूर व्हा.बाकीचे लाेक पळून गेले पण ताे शिष्य मनाशी म्हणाला- मी ब्रह्म, ताे हत्ती ब्रह्म. कशाला दूर जायचे? ताे बसल्या जागीच राहिला हत्ती आला व त्याने त्याला साेंडेने पकडून दूर भिरकावून दिले.
 
त्या शिष्याला बराच मार लागला. मग ताे गुरूकडे गेला व आपली हकिगत सांगून म्हणाला- ‘‘हत्ती ब्रह्म असताना त्याने माझी अशी अवस्था का केली?’’ गुरू म्हणाले- ‘‘अरे हत्ती ब्रह्म त्याप्रमाणे ताे माहुतही ब्रह्मच. त्या माहुत ब्रह्माचे तू का ऐकले नाहीस? तू पळून जावयास पाहिजे हाेतेस.अरे! सर्व ब्रह्म असले तरी ह्या जगात तारतम्याने वागावयाचे असते.’’ ही गाेष्ट ऐकून लाेक म्हणतातही गाेष्ट ठीक आहे, पण सर्व जगचमिथ्या असेल तर ताे हत्ती व माहुतदेखील मिथ्या आहेत. अशा परिस्थितीत मिथ्या जगात तारतम्याने वागावयाचे ह्याचा अर्थ काय? मृगजळातले पाणी काेणी तारतम्याने पिताे काय? भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल एक प्रख्यात श्लाेक आहेश्लाेकार्धेन प्रवक्ष्यामि यदु्नतं ग्रंथकाेटिभि:। ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या जीवाे ब्रह्मैव नापर:। काेट्यवधी ग्रंथात जे सांगितले आहे ते मी अर्ध्या श्लाेकात सांगताे. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे व जीव आणि ब्रह्म एकच आहेत-