आपण सर्व एका ईश्वराची लेकरे आहाेत. त्याला सर्व समान असणारे आपण, आपल्याच वर्तनाने, स्वभावाने भिन्न झालाे आहाेत. काेणी चांगला तर काेणी वाईट, काेणी गाेड तर काेणी कडू असा भेद निर्माण हाेण्याला आपणच कारणीभूत आहाेत. मानवी मन जाेडण्याचे आणि ताेडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे आपली जीभ हाेय. एखाद्याला चांगले म्हणता आले नाही तर वाईट तरी म्हणू नये. आपणाला चांगले बाेलता येत नसेल तर किमान वाईट तरी बाेलण्याचे टाळायला हवे. जीभेकडून हाेणाऱ्या जखमा दिसत नसल्या तरी त्या खराेखरच अत्यंत क्लेशकारक असतात. लाेक चांगले बाेललेले लवकर विसरून जातात. मात्र वाईट, कडू, क्लेशकारक बाेललेले अजिबात विसरत नाहीत.असे न विसरणे ईर्षा, द्वेष, मत्सर, क्राेध, बदला आदिंना जन्म देते.
या सर्वांचा जन्म म्हणजे सुख, समाधानाचे मरण हाेय. खराेखरच एखादी गाेष्ट वाईट असेल तर त्याला वाईट म्हणावेच लागेल.हे सत्य असले तरी आपल्या जीभेत खाेट किंवा वाईटपणा नाही याची खात्री आपण करायलाच हवी. ही खात्री आपणाला निश्चितच एक वेगळा आनंद देईल आणि चुकांची पुनरावृत्ती हाेऊ देणार नाही. या अर्थातील उणीवा आपण पदरात घ्याव्यात. महाराजांची गाथा हा अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448