प्राैढ व्य्नती म्हणते, ‘असं आहे. धिस ईज साे.’ ताे म्हणताे, ‘हे असं आहे.’ जर झाडांची पानं पिवळी असती तरी तुम्ही विचारलं असतं की पानं पिवळी का आहेत? झाडाला पानं नसती तरी विचारलं असतं की झाडाला पानं का नाहीयेत? नवसंन्यासाची दीक्षा घेतलेली एक संन्यासिनी आहे. ती अमेरिकेहून आलेली आहे. चारसहा दिवसांपूर्वी तिनं विचारलं, ‘मी तुमच्याकडे का आले आहे?’ ‘व्हाय हॅव आय कम टू यू ?’ मी म्हटलं की, ‘तू जर माझ्याकडे आली नसतीस, तर तू विचारू शकली असतीस की व्हाय हॅव आय नाॅट कम टू यू? याचा काय अर्थ ? जर तू दुसऱ्या काेणाकडे गेली असतीस तर विचारलं असतंस, व्हाय? मी आपणाकडे का आले? हा प्रश्न तू कुठंही गेली असतीस तरी सार्थ ठरला असता, कुठेही. म्हणून ताे व्यर्थ आहे.
हा सगळीकडे सार्थ नसताे, ताे प्रश्न विचारणे सार्थ ठरते. जाे प्रश्न सगळ्याच ठिकाणी लागू पडताे, ताे केवळ व्यर्थ असताे.’ प्राैढ माणूस जाणताे की जग हे असं आहे.म्हणून प्राैढ संस्कृतींनी विज्ञानाला जन्म दिला.त्यांनी धर्मांना जन्म दिला. जेव्हा संस्कृती प्राथमिक अवस्थेत असते तेव्हा ती विज्ञानाला प्रसवते.आणि जेव्हा ती शिखरावर पाेहाेचते, तेव्हा धर्माला जन्म देते. थिंग्ज आर सच, जग हे असं आहे असं म्हणणाऱ्या बुद्धीच्या परिप्नवतेची सूचना म्हणजे धर्म आहे. कुतूहल व्यर्थ आहे, पाेरकट आहे. मुलांनी ते दाखवलं तर ठीक कुतूहल म्हणजे बालपण आहे. जेव्हा कृष्ण म्हणताे की ज्ञानविज्ञानानं जाे तृप्त आहे, ज्याचे आता काही प्रश्न नाही राहिले, तेव्हा त्याचा अभिप्राय ज्याला सगळी उत्तरं मिळाली असा नाहीये.