जीवनात बदल महत्त्वाचा असताे. केवळ दाेनजण केव्हाच बदलत नाहीत. एक मूर्ख आणि दुसरा मृत मनुष्य! आपण हे विसरताे की, शिडी अथवा रस्ता काही बसण्यासाठी वा थांबण्यासाठी नव्हेत, तर त्यावरून चालायचे आहे, पुढे जात राहायचे आहे. आपला भूतकाळ विसरून जाणे म्हणजेच बदल घडवून आणणे, असा त्याचा अर्थ हाेत नाही. बदलाचा अर्थ हाेताे गतिमानता. पाणी थांबून राहिले, तर गढूळ बनते आणि जीवन थांबले तर ते धूसर बनते.