ओशाे - गीता-दर्शन

    06-Feb-2023
Total Views |
 

Osho 
 
या श्लाेकांमध्ये मागच्या सूत्राबाबात काही आणखी नवे संकेत देण्यात आले आहेत-‘ज्ञानविज्ञान यांनी जाे तृप्त आहे.’ स्वत:ला जाणून घेण्याला ज्ञान म्हणतात. ‘परा’ला जाणून घेण्याला विज्ञान म्हणतात.विज्ञान याचा अर्थ आहे दुसऱ्याला जाणून घेण्याची व्यवस्था ज्ञान आहे, स्वत:ला जाणून घेण्याची व्यवस्था. ‘जाे ज्ञानविज्ञानांनी तृप्त आहे’ असे जे कृष्णाने म्हटले त्याचा अर्थ काय हाेईल? त्याचा अर्थ असा असेल का?-की जी व्य्नती आत्मज्ञानी आहे, याेगारुढ आहे, याेगाला उपलब्ध आहे, ती समस्त विज्ञान जाणून घेऊन तृप्त आहे.
असा अर्थ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण हे चुकीचे आहे. कारण असं जर असतं तर भारतात इतकी याेगारुढ माणसं झाली, की आपण सर्व विज्ञानाचं सार कधीच शाेधून टाकलं असतं. तसं काही दिसत नाही.
 
तसं जर असतं तर मग सगळ्या आईन्स्टाईनांचं, सगळ्या न्यूटनांचं, सगळ्या मॅ्नस प्लॅकांचं काम आपल्याकडच्या एकट्या याेग्याने कधीच पूर्ण करून टाकलं असते. मग काही अडचणच नव्हती. मग तर अणूरहस्य आपण कधीच हुडकून काढलं असतं. मग तर या अखिल विराट ऊर्जेचं रहस्य आपण कधीच साेडवलं असतं.म्हणून जाे काेणी असा अर्थ घेताे, ताे चूक करताे.याचा अर्थ असा नाहीये. याचा अर्थ आणखी खाेलवरचा आहे आणि हा अर्थ अगदी वरवरचा आहे, खाेलवरचा अजिबात नाहीये.सर्व ज्ञानविज्ञानाने ज्याचा आत्मा तृप्त असताे, यातल्या विज्ञानाने तृप्ती याचा अर्थ आह