वाच्यार्थ: दीर्घजीवी मूर्ख मुलगा नसलेलाच बरा.कारण ताे जन्मभर दु:ख देईल आणि ताे जन्मत:च मृत असेल तर फक्त अल्पकाळासाठी दु:ख हाेईल.
भावार्थ : येथे दीर्घजीवी पण मूर्ख असा पुत्र नसलेलाच बरा, असे सांगितले आहे.
1. मूर्ख पुत्र - पुत्र जर मूर्ख असेल, तर त्याला काही समज नसणार. राेजच ताे अशा नवनवीन गाेष्टी करेल की, त्याने माता-पित्याला त्रास, दु:खच हाेईल. पुत्र जन्माचे सुख-समाधान मिळणे तर दूरच; पण त्याची सदैव देखभाल आणि काळजी करावी लागेल.
2. जन्मत: मृत पुत्र - पुत्र जन्माचा आनंद हा अतुलनीय असताे. पुत्र जन्मत: मृत असल्यास अतीव दु:ख हाेते; परंतु कालांतराने ते दु:ख हलके हाेते. कारण, तेव्हा दुसऱ्या पुत्राच्या जन्माची आशा असते.