सत्य ताे आवडे । विकल्यानें भाव उडे ।।1।।

    04-Feb-2023
Total Views |
 
 
 

saint 
सत्य हा मानवी जीवनाचा खरा आधारस्तंभ आहे. सत्याला मरण नाही, असे आयुष्यात एकदाही म्हटले नाही, असा माणूस सापडणे कठीण आहे. पण दुर्देवाने नमूद करावे लागते की, अशा महत्वपूर्ण वाक्याचा उच्चार करणारा माणूसच प्रसंगानुरुप म्हणा की स्वार्थापाेटी म्हणा बऱ्याचवेळा असत्य करून माेकळा हाेताे. जर प्रत्येक व्यक्ति सत्याने वागत असेल तर मग जगात फसवेगिरी, चाेरी, लबाडी, हाेतेच कशी? जगात असत्याच्या मार्गाचा वेग जास्त असल्याचे आपल्या निदर्शनास येते. सत्याची आवड आहे, सत्यानेच वागताे आहाेत, सत्यानेच वागणार आहाेत, असे माणूस म्हणताे फक्त. एखादा सत्याने वागत असेल तर त्यालाही लाेक सत्याने वागू देत नाहीत. फार सत्यवादी गेला का? म्हणूत्याची टिंगल टवाळी करून आनंद लुटणारेही भरपूर आहेत.
 
अशा त्रास देणाऱ्या, फसवाफसवी करणाऱ्या जगात सत्याची कास धरून चालणे अवघड आहे. तरीपण सत्याबाबत कसलाही संशय न बाळगता, सत्यावर भाव ठेवून त्याची आवड करणारा आणि सत्याने वागणारा खराेखर पूजनीय असताे. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, सत्य ताे आवडे । विकल्यानें भाव उडे ।। यामुळे आपण सत्याने वागणेच याेग्य असेल. सत्य हा आनंदाचा आधारस्तंभ असल्याने त्याचा सांभाळ करणे याेग्य. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448