जें जें भेटे भूत। तें तें मानिजे भगवंत। हा भक्तियाेगु निश्चित। जाण माझा ।। 10.118

    04-Feb-2023
Total Views |
 

Dyaneshwari 
या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण आपल्या विभूतींचा परिचय करून देत आहेत. विविध अंगांनी झालेला विस्तार आणि बुद्ध्यादी विकार इत्यादी सर्व आपल्याच विभूती आहेत, हे सर्व जाणून सर्व प्राणिमात्रांत एक परमात्मतत्त्व पाहणे, हेच भक्तिमार्गाचे तत्त्व या ठिकाणी स्पष्ट केले आहे. अर्जुना, ब्रह्मदेवांपासून मुंगीपर्यंत माझ्याशिवाय दुसरी गाेष्टच नाही, असे जाे मानताे ताे खरा ज्ञानी हाेय. त्याला चांगले व वाईट या भेदाचे स्वप्नही उरत नाही. मी, माझ्या विभूती, विभूतीने व्यापलेले आणि हे सर्व एकच आहेत अशी त्याची प्रचीती असते.म्हणून ऐक्यभावाने माझ्या मनाशी जाे एकरूप झाला ताे कृतार्थ झाला, असे म्हणावयास हरकत नाही. या अभेद्यदृष्टीने जाे मला भजताे, त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझाच प्रवेश झालेला असताे. म्हणून या अभेदाला भक्तियाेग असे नाव आहे.
 
याचे आचरण करीत असताना शंका घेऊ नये किंवा त्यात खंड पाडू नये. यात थाेडा जरी व्यत्यय आला तरी ारसे बिघडत नाही. त्यापासून चांगले फल मिळते.हे मागे सहाव्या अध्यायातील चाळीसाव्या श्लाेकात सांगितले आहे हे माझे ऐक्य कसे आहे? हा प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाला असेल. म्हणून मी आता सांगताे ते ऐक.लाटांचा जन्म व त्यांचा लय पाण्यातच हाेताे, त्याप्रमाणे सर्व विश्वाला माझ्याशिवाय आधार नाही. मी व्यापक आहे असे समजून प्रेमाने भजल्यास मी प्राप्त हाेताे. असे आत्मज्ञानी मला जगद्रूप समजून वावरत असतात.जाे जाे प्राणी दिसेल ताे ताे परमात्मा आहे, हाच खरा भक्तियाेग हाेय.