पत्र दुसरे
काही लाेक म्हणतात कीतुकारामांच्या अभंगात कमालीची आर्तता आहे म्हणून रडवे आहेत. या लाेकांना परमार्थाची खरी कल्पना नाही.हवेशिवाय मनुष्य जगू शकत नाही हे जितके खरे तितकेच आर्तता असल्याशिवाय देवाची भेट हाेत नाही हे खरे आहे.तुकारामांची आर्तता हा रडवेपणा नसून देवाच्या भेटीपूर्वीची ती साहजिक अवस्था आहे.ते म्हणतात- बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी। झालाे मी परदेशी तुझ्याविण। समर्थ रामदास रडवे नव्हते हे सर्वत्रांना मान्य आहे, पण ते देखील म्हणतातधाव रे रामराया किती अंत पहाशी। प्राणांत मांडियेला न ये करूणा कैसी।। तू असे लक्षात घे कीआर्तता म्हणजे रडवेपणा नव्हे.अश्रूअश्रूमध्ये फरक असताे. काही काही अश्रू इतके पवित्र असतात की, अन्नाच्या दृष्टीने पावसाचे जितके महत्त्व तितके कल्याणाच्या दृष्टीने अश्रूंचे महत्त्व आहे.
दुबळेपणाने व पातिव्रत्याच्या खाेट्या कल्पनेने दारूड्या नवऱ्याच्या लाथा खाणाऱ्या सिंधूचे अश्रू जगाला नकाे असतील, पण प्रेमाच्या पवित्र पुष्पांनी पतीची पूजा करणारी सीता राम वनवासाला निघाल्यावर त्याच्याबराेबर जाणार म्हणून हट्ट धरून बसली, त्यावेळी तिच्या डाेळ्यांत येणारे अश्रू जगाला हवेहवेसे वाटतात.आता जिंकायला जग नाही म्हणून सिकंदर रडला,त्या अश्रूमध्ये पावित्र्य नाही, पण देवाच्या भेटीसाठी जेव्हा भ्नताच्या डाेळ्यांत अश्रू येतात तेव्हा त्यामध्ये कल्पनातीत पावित्र्य असते.तुला एक गुह्य गाेष्ट सांगताेप्रगती हाेत असताना ज्याप्रमाणे नाव प्रथम एका बाजूला व मग विरुद्ध बाजूला कलते आणि नंतर पुढे सरकते त्याप्रमाणे परमार्थमार्गात मन प्रथम अस्तिकवादाकडे जाते. खूप प्रयत्न करूनही देव भेटत नाही असे पाहून मन नास्तिकवादाकडे झुकते. निराशेचे टाेक गाठले जाते. मग पुढची अवस्था सुरू हाेते. निराशेच्या काळ्याकुट्ट ढगाभाेवती अंतरंगातील देवाचा प्रकाश दिसू लागताे. मग मन आनंदाने भरून जाते.
अशा वेळी तेज, अनाहत नाद व आनंद या त्रयीने माणसाचे जीवन सुखी हाेते. त्याला वाटू लागते कीदेव आपल्याच अंत:करणात आहे.या आनंदाच्या साम्राज्यात उन्मनी अवस्थेचा ध्वज फडकू लागताे, अनाहत ध्वनीचे गाणे सुरू हाेते व पराेपकाराकडे प्रसाद वाटला जाताे.काही लाेक म्हणतात की, पापपुण्याच्या जुनाट कल्पनांमुळे तुकाराम रडवे वाटतात, हल्लीच्या सुधारलेल्या काही तज्ज्ञांना वाटते कीदुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य व द्सऱ्याला पीडा देणे म्हणजे पाप.तुला आश्चर्य वाटेल की, तुकारामांचे असेच म्हणणे आहे. ते म्हणतात कीपुण्य पर-उपकार पाप ते परपीडा। आणिक नाही जाेडा दुजा यासी।।