काेणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिज

    28-Feb-2023
Total Views |

Gondavekar
जेथे भगवंताचे नामस्मरण । तेथे सर्व संतांचे ठाण जाेंवर धरिली जगाची आस। ताेंवर परमात्मा दूर खास ।। परमात्म्याची प्राप्ति । न हाेई राखता विषयासक्ती।। जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले तरी घातासी आले ।। विषयी एकजीव झालाे जाण। सुटता न सुटे आपण जाण।। मान, अपमान, जगाचे सुखदुःख। हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ।। अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण। हे जीवपणाचे मुख्य लक्षण।। सुख, दुःख, विपत्ति। ही माया प्रपंचाची ओहाेटी भरती ।। आत्मविश्चय बाणल्यावांचून। माया न हटे, न सुटे जाण।। आता करी शूर मन। मायेसी हटवावे आपण।। जैसे जैसे बाहेर दिसले। त्याचे बीज आपणाशीच उरले।। एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण हाेते समाधान । असत्य वस्तू सत्य जाणली ज्याने।। सत्य वस्तू प्रगट हाेईल तेणे ।।
 
ज्याच्यांत मानावे मी सुख। त्याच्यातच उद्भवते दुःख।। नराचा हाेय नारायण। जर न चुकला मार्ग जाण।। जेथे ठेवावी आस । त्याचे बनावे लागते दास ।। देह ताे पंचभूतांचा। त्याचा भरवसा न मानावा ारसा।। मी तुम्हांस सांगताे हित?। दृश्यांत न ठेवावे चित्त।। दृश्य वस्तू नाशिवंत असते। भगवत्कृपेने समाधान येते।। परिस्थिती नसे बंधनास कारण। असे आपलेच मनाची ठेवण।। देवास पाहावे ज्या रीतीने। तसाच ताे आपणास दिसताे जाण।। विषयाचा नाही झाला जाेंवर त्याग। ताेंवर रामसेवा नाही घडत सांग।। आपले आत्यंतिक हित। हेच खरा स्वार्थ जाण।। देहासकट माझा प्रपंच। रामा केला तुला अर्पण। ऐसे वाटत जावे चित्ती। कृपा करील रघुपति।। चित्ती जे विषयापासून सुटले। ते आनंदासी आले।।
 
रामनाम प्रेमयुक्त चाले धणी। तमाेगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येताे. दुष्ट बुद्धी हा तम ाेगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची साेय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा उदय हाेताे आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश हाेताे हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी ाेडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते.आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लाेक फसतील, पण भगवंत फसणार नाही. प्रापंचिक गाेष्टीकरिता उपवास करणे ही गाेष्ट मला पसंत नाही.
 
‘उपवास घडावा’ यात जी माैज आहे ती ‘उपवास करावा’ यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करताे आहाेत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले? याउलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लाेक वेडे असतात; त्यांना आपण उपासतापास कशासाठी करताे आहाेत हेच समजत नाही.काेणत्याही कृतीला वास्तविक माेल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र ार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहताे.
 
माणसाने केलेला उपवास निष्काम असून ताे केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर ारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे ार ार महत्त्व आहे. ‘भगवंतासाठी भगवंत हवा’ अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समाेर उभा ठाकला, आणि? ‘तुला काय पाहिजे?’ असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’ हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता हाेय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा हाेईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल, आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे.