पत्र सहावे अशा तऱ्हेची भ्नताची 36 लक्षणे बाराव्या अध्यायात दिली आहेत, त्यावरून तुला समजून येईल की, भ्नत हाेणे साेपे नाही.
आपणाला वाटते-आपण पत्नी, देव आपला पति! पण तू असे लक्षात घे की, देव सनातनी आहे ताे पत्रिका पाहताे आणि 36 गुण जुळल्याशिवाय ताे वधू पास करीत नाही.रामायण हे साध्या अक्षरांचे महाकाव्य आहे पण महाभारत जाेडाक्षरांचे महाकाव्य आहे. महाभारतातील पेचप्रसंग फार बिकट आहेत. महाभारत वाचून तुला कळून येईल की, फ्नत श्रीकृष्णच वाटेल ताे पेचप्रसंग साेडवू शकताे. द्युताच्या वेळी ताे हजर नव्हता म्हणून सारा घाेटाळा झाला, त्याचप्रमाणे काैरव-पांडवांच्या वेळी जर श्रीकृष्ण हजर नसता तर कमालीचा घाेटाळा झाला असता. आपल्याच बांधवांच्या बराेबर युद्ध करावे की करू नये, हा जाे अर्जुनाला पेचप्रसंग पडला हाेता, ताे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जास्तीत जास्त कठीण हाेता.
जेव्हा पेचप्रसंग सुटत नाही, तेव्हा मुदत मागितली जाते.कायद्याच्या प्रान्तात एक मजेशीर गाेष्ट आहे.प्राेटॅगाेरस व इव्हाॅल्थस ही गुरुशिष्याची जाेडी आहे.त्यांच्यामध्ये असा करार झाला हाेता की, गुरूने शिष्याला कायद्याचे ज्ञान शिकवावयाचे व जेव्हा शिष्य काेर्टात पहिला कब्जा जिंकेल, तेव्हा शिष्याने गुरूची सारी फी द्यावयाची.गुरूने शिष्याला कायद्याचे सारे ज्ञान शिकविले. पण शिष्य काही गुरूची फी देईना, तेव्हा आपली फी मिळविण्याबद्दल गुरूने शिष्यावर काेर्टात दावा लावला.गुरूने म्हटले,‘‘काही झाले तरी माझा जयच! माझी फी शिष्याने दिली पाहिजे, असे न्यायाधीशांना वाटले तर कज्जा जिंकला. जर माझे न्यायाधीशांना पटले नाही तर त्याचा अर्थ असा की, शिष्याने पहिला कज्जा जिंकला. आमचा करारच असा आहे की, शिष्याने पहिला कज्जा जिंकला की, माझी फी द्यावयाची.
तेव्हा अशा परिस्थितीत शिष्याने माझी फी दिली पाहिजे. म्हणून मी म्हणताे की, काही झाले तरी माझा जय ठरलेला!’’ शिष्य म्हणाला, ‘‘न्यायाधीश महाराज, काही झाले तरी माझा जय न्नकीच.मी फी देण्यास बांधलेला नाही, असे तुम्हाला वाटले तर माझा जय झाला. जर मी फी दिली पाहिजे असे वाटले तर त्याचा अर्थ असा की, मी अजून पहिला कज्जा जिंकला नाही आणि ताेपर्यंत कराराप्रमाणे मी फी देण्यास बांधलेला नाही.गुरू व शिष्य दाेघेही म्हणत हाेते, आपला जय ठरलेला.न्यायाधीशांनी ह्या कज्जाची पुढील तारीख 100 वर्षानंतर ठेवली आहे.
शंभर वर्षानंतर प्राेटॅगाेरस, इव्हाॅल्थस आणि न्यायाधीश काेणीच जिवन्त राहणार नाही. पेचप्रसंग सुटला नाही तर मुदत मागावयाची हा जाे प्रकार आहे, त्याचा येथे कडेलाेट झाला आहे.गीतेतील पेचप्रसंग असाच फार कठीण आहे. कृष्ण नसता तर ताे पेच प्रसंग काेणालाच सुटला नसता. गीता सांगून कृष्णाने जणू काही पेचप्रसंगांचा काेशच तयार केला आहे.एखादा शब्द नडला म्हणजे आपण ड्निशनरी पाहताे, त्याप्रमाणे एखादा पेचप्रसंग निर्माण झाला की, गीता पाहावी म्हणजे ताे पेचप्रसंग सुटेल.