प्राणी मायाजाळी पडिले । ऐसे जेणे मुक्त केले । ताे सद्गुरू जाणावा ।।

    23-Feb-2023
Total Views |
 
 

saint 
 
श्रीसमर्थ म्हणतात की, जे सिद्धिप्राप्त आहेत, चमत्कार दाखवितात, मंत्र, तंत्र, जादूटाेणा, भूतभविष्य, सुवर्णयाेग सांगतात ते करामती म्हणावेत किंवा ार तर त्या विद्येतील गुरू म्हणता येतील. परंतु, असे लाेक साधकांना माेक्ष देणारे सद्गुरू कधीही हाेऊ शकत नाहीत. तसं पाहिलं तर प्रत्येक शास्त्रामध्ये - मग ते ज्ञान, वैद्यक, संगीत, व्यापार, यंत्रविद्या असे काेणतेही असाे, त्यातील पारंगत माणूस ती विद्या शिकवू शकताे. या कारणाने त्याला त्या शास्त्रातील गुरू म्हणता येईल. अपत्याला शहाणेसुरते करणारे आईबाप त्याचे गुरूच हाेत; पण सद्गुरू नव्हेत.अनेकदा स्वत:ची जाहिरातबाजी करून गुरू म्हणविणारे लाेक पैसा, प्रसिद्धी आणि स्त्रिया यांच्या माेहातच गुंतलेले असतात.
 
त्यासाठी श्रीमंत शिष्याला आवडेल आणि ते जास्तीत जास्त पैसे देतील असेच वागून लाचार असतात. असे भाेंदू कितीही उत्तम वक्ते असले, अभिनयपटुत्वाने उत्तम कीर्तन-प्रवचन करीत असले, तरी ते शिष्यांना इंद्रियांवर विजय मिळविण्याचे मार्गदर्शन करीत नाहीत. अशांची निर्भत्सना करताना श्रीसमर्थ राेखठाेकपणे अधम, भांडसारू, चाेरटे, मैंद आणि पामर अशा शब्दांत करतात आणि तुच्छतेने म्हणतात की, असले गुरू जरी पैशाला तीनप्रमाणे मिळाले, तरी त्यांचा त्याग करावा आणि अशांच्या नादी चुकूनही लागू नये. भाेेंदू लाेकांची अशी संभावना करून श्रीसमर्थ म्हणतात की, जाे शिष्याला इंद्रियांवर विजयाचा मार्ग सांगताे, आत्मज्ञानाचा उपदेश करून अविद्येच्या बंधनातून मुक्त करताे ताे सद्गुरू आहे हे जाणून घ्यावे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299