गीतेच्या गाभाऱ्यात

    23-Feb-2023
Total Views |
 
 
पत्र पाचवे
 

bhagavtgita 
 
माझा माेह गेला असे प्रथम केव्हा म्हटले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गीतेचा नीट अभ्यास केला म्हणजे आपणास कळून येईल की, गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लाेकात माझा माेह गेला अशी अर्जुनाने पावती दिली आहे. गीतेच्या आरंभी अर्जुनास माेह झाला हाेता याबद्दल दुमत नाही. ज्ञानयाेग ऐकून, कर्मयाेग ऐकून किंवा ध्यानयाेग ऐकून अर्जुनाचा माेह गेला, नाही तर भ्नितयाेग ऐकल्यानंतर त्याचा माेह गेला ही गाेष्ट फार महत्त्वाची आहे.या विवेचनावरून असे लक्षात येईल की, अर्जुनाच्या दृष्टिने भ्नितयाेगाला फार महत्त्व दिले आहे. भगवान गाेपाळकृष्णांनीदेखील भ्नितयाेगाला जास्तीत जास्त महत्त्व दिले आहे. अकराव्या अध्यायात भगवानांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले व नंतर सांगितले.
 
नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्यया। श्नय एवंविधाे द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा।।53।। भ्नत्या त्वनन्यया श्नय अहमेवंविधाेऽर्जुन। ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप।।54।। तू जसे मला पाहिलेस त्याप्रमाणे वेदांच्या याेगाने, तपश्चर्येने किंवा यज्ञानेही काेणी मला पाहणे श्नय नाही. केवळ अनन्य भ्नितनेच हे अर्जुना, याप्रमाणे माझे ज्ञान हाेणे, मला पाहणे आणि माझ्या ठायी तत्त्वाने प्रवेश करणे श्नय आहे.गीतेच्या शेवटी भगवंतांनी गुह्यातीत गुह्य सांगताना सांगितले: ‘‘मन्मना भव मद्भ्नताे मद्याजी मां नमस्कुरू। मामेवैष्यासि सत्यं ते प्रतिजाने प्रियाेऽसि मे।।65।। सर्वधर्मांन्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वां सर्व पापेभ्याे माेक्षयिष्यामि मा शुच:।।66।। माझ्या ठायी मन ठेव, माझा भ्नत हाे, माझे भजन कर आणि मला नमस्कार कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील, हे सत्य प्रतिज्ञेने मी तुला सांगताे. कारण तू माझा आवडता आहेस. सर्व धर्म साेडून मला एकट्याला शरण ये. मी तुला सर्व पापातून मु्नत करीन, दु:ख करू नकाेस.
 
यावरून आपणाला कळून येईल की, अर्जुनाला जास्तीत जास्त महत्त्व भ्नितयाेगाबद्दल वाटले आणि भगवंतांनीदेखील भ्नितयाेगाला महत्त्व दिले. आपण जर सखाेल अभ्यास केला तर असे दिसेल की, तत्त्वज्ञदेखील भ्नितयाेगाला जास्तीत जास्त महत्त्व देतात.तू आपल्या पत्रात लिहितेस, ‘‘स्त्री शूद्रादिकांनी अथवा अहिन्दूनी वेद ऐकता कामा नये अशी काही लाेकांची समजूत आहे. ही समजूत कितपत बराेबर आहे. वेदामध्ये जे तत्त्वज्ञान आहे ते उपनिषदांत आहे आणि उपनिषदांचे सार गीतेत आहे. वेद अहिन्दूनी व स्त्री शूद्रादिकांनी ऐकू नयेत हे म्हणणे मला वाटते बराेबर नाही. तुम्हाला काय वाटते?’’ मला वाटते, स्त्री-शूद्रादिकांनी अथवा अहिन्दूनी वेद ऐकू नयेत ही समजूत चुकीची आहे. वेद फार पवित्र आहेत. ते नुसते ऐकण्यानेदेखील मनाला फार माेठे समाधान वाटते. जाे कृष्णाचा खरा भ्नत आहे ताे असेच म्हणेल की वेद जास्तीत जास्त लाेकांनी ऐकावेत.तुला एक घडलेली गाेष्ट सांगताे.पं. सातवळेकर औंधमध्ये असताना कितीतरी लाेक वेदासाठी त्यांच्या हाताखाली काम करीत असत.