माेठे असूनही माेठेपणाला जवळ येऊ न देणे ही साधी बाब नाही. ज्यांच्यासमाेर माेठेपणही लहान हाेऊ शकते किंवा माेठेपणालाही त्यांच्यामुळे माेठेपणा मिळू शकतेा,असे तुकाेबाराय माेठेपणा नाकारतात आणि दुसरीकडे पात्रता नसतांनाही माेठेपणा मिळावा म्हणून कांही लाेक रात्रंदिन प्रयत्नात असतात. हा विराेधाभास पाहिला म्हणजे माेठेपणाच्या मागे लागलेल्या लाेकांची कीव येते. मी असा आहे, मी तसा आहे असे हे लाेक म्हणतच राहतात. त्याचबराेबर आपल्या आवती भाेवती चार दाेन भाटही हे लाेक ठेवत असतात.मी नांदेडला हाेताे, तेव्हाचा एक प्रसंग आहे.
ताे असा, एका माेठ्या व्यक्तीच्या हस्ते एका कार्यक्रमाचा शुभारंभ हाेणार हाेता. मी त्यांच्या वाहनात बसलाे हाेताे. त्या वाहनात बरेचशे शाल श्रीफळ, हार हाेते. मला वाटले हे सर्व स्थानिक लाेकांच्या सत्कारासाठी असतील. पण तिथे चित्र वेगळेच पाहिले.हे हार, श्रीफळ, शाल स्थानिक लाेकांच्या माध्यमातून या यांचे काैतुक करीत यांना दिले जात हाेते. लाेकांनाही फुकटचे साहित्य घेऊन यांचे काैतुक करण्यात आनंद वाटत हाेता आणि स्वत:चे हार तुरे देउन काैतुक करुन घेण्यात यांचा आनंद तर शब्दाच्या पलिकडचा हाेता. या सत्कारातून या यांचे चार लाेक तयार हाेत असावेत. असाे, आपणाला असे सत्कारही नकाेत आणि असे काैतुकही नकाे.
जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448