संतांचे हाेणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे

    22-Feb-2023
Total Views |
 
 
 
Gondavelakr
 
मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परम ात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीतकाेणाला? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये.मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालाे नाही. जाे भगवंताच्या इच्छेने वागताे, त्याचे चांगले हाेते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे.भगवंताचे रूप आनंदमय आहे, सृष्टींचा क्रमच असा आहे की ताे माणसाला आनंदाप्रत पाेचवीत असताे. अत्यंत दरिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दु:खाचे गाडे कुठून आले? मला दु:ख हाेते ते माझे कुठे तरी चुकते म्हणून! मी चुकला का बराेबर ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही, कारण ताे आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही, कारण ताे देव जाणतच नाही; ‘सर्व काही मी करताे, आणि देव नाहीच’ म्हणून म्हणताे. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते.जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट हाेते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे हाेऊन राहावे.
 
त्यांचे झालाे म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे.संतांचे हाेणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगता वागणे हेच मुक्यांचे लक्षण. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दु खाचे कारणच राहात नाही. देव सर्वव्यापी म्हणावे, आणि माझ्यात नाही असे कसे म्हणावे? जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान हाेते, हीच त्यांची खरी कृपा हाेय. श्रद्धेने जे काम हाेते ते तपश्चर्येने हाेत नाही.आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात् परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. तिकडे लक्ष देऊ नये, आणि नाम घेणे हे आपले काम करीत रहावे, विकार आपाेआपच कमी हाेत जातील. मात्र, म नाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके जपले पाहिजे.