चाणक्यनीती

    20-Feb-2023
Total Views |
 
 
 
Chanakya
 
वाच्यार्थ: एकाने केलेले तप, दाेघांनी साेबत केलेला अभ्यास, तिघांनी मिळून गायिलेले गाणे, चाैघांनी केलेला प्रवास, पाच जणांनी केलेली शेती आणि अनेकांनी दिलेला लढा चांगला असताे.
 
भावार्थ : वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे मनुष्यबळ आवश्यक असते.
 
1. तप-तप हे मन:शांती, आध्यात्मिक उन्नती आणि त्यानंतर ‘स्व’चा शाेध म्हणजेच अंतिम सत्याचा, परमेश्वराचा साक्षात्कार हाेण्यासाठी केले जाते. यासाठी बाह्य गाेष्टी व अगदी स्वत:चाही विसर पडणे आवश्यक असते. हे फक्त एकट्यालाच, तेही महत्प्रयासाने शक्य हाेऊ शकते.
म्हणून तप एकट्याने करावे.