गीतेच्या गाभाऱ्यात

    18-Feb-2023
Total Views |
 
 
पत्र चाैथे
 

Bhagvatgita 
 
तत्त्वज्ञांचा मेरुमणी जर काेण असेल तर ताे श्रीकृष्ण.सुखाचे प्रसंग येवाेत अथवा दु:खाचे प्रसंग येवाेत कृष्ण आतून हसत असताे.तू असे लक्षात घे की - आपण उच्च ध्येयाचे पाठीमागे लागून त्यात रंगून गेलाे म्हणजे आपणाला वाटू लागते की - सुखात ज्याप्रमाणे आनंद आहे त्याचप्रमाणे दु:खात देखील आनंद आहे.एकदा सत्यभामेने द्राैपदीला विचारले, ‘‘वनामध्ये राहत असूनही तू आनंदी कशी? इतके दु:ख असतानाही तू आनंदी कशी? आम्ही द्वारकेमध्ये राजवाड्यात रहात असूनही आनंदी नाही आणि वनवासात देखील तू आनंदी कशी? द्राैपदी म्हणाली, दु:खेन साध्वी लभते सुखानि। साध्वी दु:खाने सुख मिळवते. द्राैपदीचा हा विचार फार माेठा व अत्यंत दिव्य आहे.
 
तू राेज ध्यान करीत जा, व असं लक्षात घे की - अंतरंगातील आत्म्याचे संगीत आणि जगातील विश्वात्म्याचे संगीत यांचा जेव्हा सूर जुळताे तेव्हा दिव्य विचार ध्यानात ऐकू येतात.तू विचारतेस की महाभारतात व गीतेत व्यासांनी काेणता धर्म सांगितला आहे? त्या प्रश्नाचे उत्तर थाेड्नयात असे आहे की - महाभारतात व गीतेत व्यासांनी मानवता धर्म सांगितला आहे. या मानवता धर्मात श्रद्धेला स्थान आहे. पण श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. मानवता धर्मात श्रद्धेला स्थान आहे, पण विचाराला जास्तीत जास्त प्राधान्य आहे.गीता वाचून तुला कळेल की - अंतरंगातील दिव्यश्नतीला स्मरून जास्तीत जास्त विचार करणे व त्याप्रमाणे वागणे हे मानवाचे प्रधान कर्तव्य आहे.
 
भगवान प्रल्हादाला म्हणाले - ‘‘वर माग.’’ प्रल्हाद म्हणाला - ‘‘देवा! काय मागावे कळत नाही. तुम्हीच तुम्हाला वाटेल ताे सर्वश्रेष्ठ वर द्या.’’ भगवान म्हणाले, ‘‘विचाराेऽस्तु।’’ यावरून तुला विचाराचे महत्व कळून येईल.तू म्हणतेस की - गीता वाचून जीवनात जे जे प्रश्न असतील त्यांचा बुद्धिनिष्ठ पद्धतीने गीतेच्या गाभाऱ्यात विचार झाला पाहिजे.तुझा हा विचार मान्य आहे.शेवटी तू आपल्या पत्रात विचारतेस - Whether knowledge comes through books? (पुस्तकामुळे ज्ञानप्राप्त हाेते का?) या प्रश्नाचे उत्तर असे की- Information comes through books and knowledge comes through thinking (पुस्तकामुळे माहिती मिळते आणि विचाराने ज्ञान प्राप्त हाेते) ... असाे! तुझा राम (क्रमशः)