पत्र चाैथे
चमत्कार करून दाखवण्याकरता जाे ईश्वराकडे धाव घेताे त्याला ईश्वर कधीही भेटत. नाही आनंदप्राप्तीसाठी जाे ईश्वराकडे धाव घेताे त्याला अंतरंगात दिव्यश्नतीचा बाेध हाेताे. ‘न धरी शस्त्र करी’ असे म्हणणाऱ्या कृष्णाने ज्याप्रमाणे अर्जुनाला सल्ला दिला त्याप्रमाणे अंतरंगातील दिव्यश्नती आपणाला सल्ला देत असते. हा सल्ला मानून आपण काम करू लागलाे म्हणजे आपणाला पराकाष्ठेचा आनंद हाेताे.तू ध्यानाबद्दल एक विशिष्ट प्रश्न विचारला आहेस. त्या बाबतीत असे म्हणता येईल की, आपण ध्यान करू लागलाे म्हणजे केव्हा आपणाला काही शब्द ऐकू येतात. ह्या शब्दांना फार महत्त्व असते.मी एकदा ध्यान करत असताना मला खालील शब्द ऐकू आलेसुखात ज्याप्रमाणे आनंद आहे त्याप्रमाणे दु:खातदेखील आनंद आहे, हे ज्याला कळले व वळले ताे खरा तत्त्वज्ञानी.
हा विचार मला पूर्वी कधी सुचला नव्हता. ध्यानात जेव्हा मला वरील शब्द ऐकू आले तेव्हा मला वाटू लागले कीसुखात आनंद आहे हे म्हणणे ठीक आहे. पण दु:खात कसा आनंद असू शकेल? ध्यानात ऐकू आलेल्या वरील शब्दांबद्दल मी खूप खूप विचार केला, किती तरी लाेकांशी विचारविनिमय केला.काही लाेक म्हणाले की सुखात आनंद असताे हे म्हणणे ठीक आहे. पण दु:खात आनंद असताे हे म्हणणे बराेबर नाही.काही तत्त्वज्ञानी लाेक म्हणाले कीवरील विचार दिव्य आहे व त्यामध्ये फार माेठा अर्थ साठवला आहे.मी विचार करू लागलाेस्त्रीला गर्भारपण व बाळंतपण दु:खकारक असते पण पुढे मूल जन्माला येणार या कल्पनेमुळे तिला गर्भारपणाच्या व बाळंतपणाच्या दु:खात देखील आनंद वाटत असताे.संस्कृतमध्ये एक अत्युत्कृष्ट श्लाेक आहेन त्वहं कामये राज्यं न स्वर्ग नापुनर्भवम्। कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्।। मला राज्याची इच्छा नाही, स्वर्गाची नाही किंवा माेक्षाची नाही. दु:खाने तृप्त झालेल्या प्राण्याचे दु:ख नाहीसे करावे एवढीच माझी इच्छा आहे.
देवाने कुंतीला म्हटले, ‘‘वर माग.’’ कुंती म्हणाली- विपद: सन्तु न: शश्वत्।’ आमच्यावर नेहमी विपत्ती येवाेत.दु:खातला आनंद कुंतीला माहीत हाेता.लाेकमान्य टिळकांना राजेद्राेहाच्या खटल्यात कडक शिक्षा देण्यात आली. जमलेले लाेक रडू लागले. फार दु:खकारक प्रसंग हाेता, पण त्या दु:खात देखील टिळकांना आतून आनंद हाेता. ते न्यायमूर्तींना म्हणाले हाेतेDespite the verdict of the Jury I maintain that I am innocent. It may be the will of the Providence that the cause which I represent may prosper more by my suffering than by my remaining free.आपल्या दु:खामुळे भारतीयांचे कल्याण हाेईल हा विचार इतका स्फूर्तिदायक हाेता की त्यामुळे दु:खाच्या प्रसंगी देखील लाेकमान्य टिळकांना आतून आनंद वाटत हाेता व त्या आनंदाचा अनुभव घेत त्या रात्री ते सुखाने झाेपी गेले.