मनुष्य स्वतःच स्वतःचा शिक्षक आहे.एखाद्या लहानशा मुलालाही तुम्ही शिकवू शकता, असे तुम्हाला वाटते का ? नाही.तुम्ही त्याला शिकवू शकत नाही. ताे स्वतःच शिकत असताे. पालक या नात्याने तुमचे कर्तव्यच बनते की, तुम्ही त्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करायला हवेत. एक राेपटं वाढतंय! तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही त्या राेपट्याला वाढवताय? हे अशक्य आहे. तुम्ही केवळ वेळच्या वेळी त्याला खतपाणी घालू शकता आणि त्याच्या संरक्षणासाठी ार ार तर त्याच्या भाेवती एखादे कुंपण घालू शकता !