पत्र चाैथे
तू विचारते की या बाबतीत तुमचे काय मत आहे? तू असे पाहा कीजगातल्या तत्त्वचिंतकांनी देवाबद्दल खूप खूप विचार केला आहे.तुला डाॅ. जाेडचे नाव ऐकून माहीत असेल.पाश्चात्त्य तत्त्वज्ञांमध्ये त्याला फार माेठा मान आहे. काही लाेक म्हणतात की अलीकडल्या काळात एवढा माेठा मान तत्त्वज्ञानी झाला नाही. डाॅ. जाेडने खूप ग्रंथ लिहून असे दाखवून दिले की या जगात देव नाही.ताेच डाॅ. जाेड म्हणताे, जीवनाच्या संध्याकाळी जगाला रामराम ठाेकण्यापूर्वी तुम्हाला मी एक संदेश देणार आहे.जाे संदेश देऊन डाॅ. जाेड या जगातून निघून गेला ताे संदेश असा- या जगात तेच लाेक सुखी हाेतात की ज्यांचा देवावर विश्वास आहे.इतकी गाेष्ट खरी आहे कीदेवाच्या नावावर लाेकांना फसवणारे व स्वत:चा स्वार्थ साधणारे लाेक या जगात खूप आहेत.
खरी किंमत अनुभवाला आहे. आपणाला असा अनुभव येताे कीआपल्या अंतरंगात दिव्यश्नती आहे व ती श्नती आपणाशी बाेलते, त्या दिव्यश्नतीलाच आपण ईश्वर म्हणू.गीतेची सांगणे असे आहे कीईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति। ईश्वर सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे.ईश्वराचा बाेध झाला म्हणजे माणूस निसर्गनियमांच्या पलीकडे जाताे, ताे वाटेल ते चमत्कार करू शकताे हे म्हणणे बराेबर नाही.
हे विश्व, त्याच्या बुडाशी असणारी दिव्यश्नती याबद्दलचे परिपूर्ण ज्ञान अद्याप मानवाला झाले नाही. आपल्या अंतरंगात दिव्यश्नती वास करत असते व ती आपणाशी बाेलते असा अनुभव मात्र आपणाला येताे. हा अनुभव आला म्हणजे खूप खूप आनंद हाेताे. हा अनुभव आल्यानंतर निसर्गनियमांच्या पलीकडे जाऊन आपण वाटेल ते चमत्कार करू शकू असे सांगून लाेकांना झुलवत ठेवणे यामध्ये प्रामाणिकपणा नाही.
हे जग काही विशिष्ट नियमांनी बांधलेले आहे. ते नियम शाेधून काढणे ही उत्तम गाेष्ट आहे. ते नियम समजून न घेता आत्मज्ञानाच्या जाेरावर मी निसर्गनियमांना बाजूला सारून वाटेल ते चमत्कार करून दाखवीन असे म्हणणे हा ढाेंगीपणा आहे.बुद्धी गहाण ठेवून परमार्थ करावयाचा नसताे. परमार्थ प्रांतात वावरत असतानादेखील बुद्धीचा जास्तीत जास्त उपयाेग करावयाचा असताे.परमार्थमार्गात आपली खरीखुरी प्रगती व्हावयाची असेल तर चमत्कारावर विश्वास न ठेवणे बरे.प्रख्यात संत डाॅ. रामभाऊ रानडे ह्यांचा पूर्वी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या ताेंडून वेद बाेलवले व भिंत चालवली ह्या चमत्कारवर विश्वास हाेता, पण त्यांचे गुरू म्हणत असत की, असल्या चमत्कारावर विश्वास ठेवणे बरे नव्हे.पुढे पुढे रामभाऊदेखील म्हणू लागले की, आपले गुरू म्हणतात तेच बराेबर आहे.
तू लक्षात घे की,