आधी जग अंतिम हाेतं आता देव अंतिम झाला.त्याला काेणी बनवलं असं आम्ही विचारताे. जर आपण असं उत्तर देताहात की ताे न बनवलेला स्वयंभू आहे.तर मग या जगालाच स्वयंभू मानण्यात काय अडचण हाेती? तत्त्वज्ञ लाेक मुलांच्यासारखे कुतूहलात गुरफटलेले असतात. म्हणून सगळं तत्त्वज्ञान, फिलाॅसाॅफी पाेरकट असतं. तत्त्वज्ञ किती का माेठा असेना कितीही गहन-गंभीर ग्रंथराज त्यांनी लिहिलेले असाेत. हीगेल असाे की पट्टदर्शनकार मीमांसक असाे, त्यांनी कितीही जाडजूड, खाेल चर्चा करणारे ग्रंथ लिहिलेले असाेत अन् त्यांनी कितीही जाडजूड शब्द वापरलेले असाेत, शब्दाचं कितीही जाळं विणलेलं असाे, तरी जर अगदी खाेलवर जाऊन पाहिलं तर आपणाला एक लपलेलं बालक तिथे दिसल्याशिवाय राहणार नाही. ्नयुरिअस, कुतूहलाने भरलेलं आहे. हे काय आहे? ते काय आहे? मग आपलेच उत्तर देत आहे. स्वत:चेच प्रश्न आणि स्वत:चीच उत्तरं- असा हा सारा स्वत:चाच खेळ आहे.
कृष्ण म्हणताे, ‘या पाेरकटपणापासून जाे अलिप्त, अलग राहताे, तृप्त हाेऊन जाे प्राैढ हाेताे अन् म्हणताे, ‘विचारणंच व्यर्थ आहे. कारण उत्तर काेण देईल?’ जाे इतका प्राैढ हाेताे की त्याला कळतं की वस्तूंचा स्वभाव असा आहे. काहीही प्रश्न नाहीये. अग्नी जाळताे. पाणी थंड असतं.असा वस्तूंचा स्वभाव आहे.महावीरांचं एक माेठं माैल्यवान वचन आहे-ते म्हणतात, ‘वत्थू स्वभावाे धम्म.’ वस्तुस्वभावाला जाणून घेणं म्हणजे धर्म. पण ज्ञानविज्ञानाची जी जिज्ञासा आहे, अनंत जिज्ञासा आहे, आणखी जाणून घे, आणखी जाणून घे. ही जेव्हा थंड हाेते, ही धाव जेव्हा शांत हाेते, तेव्हाच वस्तूंचा स्वभाव जाणणं श्नय आहे.