गीतेच्या गाभाऱ्यात

    14-Feb-2023
Total Views |
 
 
पत्र चाैथे
 

Bhagvatgita 
 
स्वामींची कुंडलिनी जागृत झाली हाेती.स्वामी पुढे म्हणालेकुंडलिनी जागृत झाल्यावर मनुष्य पाण्यावर चालू शकताे.स्वामींना लाेकांनी खूप प्रश्न विचारले शेवटी त्यांना कबूल करावे लागले की- ‘‘माझी कुंडलिनी जागृत झाली असली तरी मी पाण्यावरचालू शकत नाही.’’ तू असे लक्षात ठेव की- विज्ञानात ज्याप्रमाणे प्रयाेगाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे परमार्थातही प्रयाेगाला महत्त्व आहे. काहीतरी बाेलण्यापेक्षा प्रयाेगाने शाबीत झालेल्या गाेष्टीला विशेष किंमत आहे प्रयाेग फसले तरी चालतील पण प्रयाेग करणाऱ्याने प्रामाणिकपणा साेडता कामा नये.तुझा पुढला प्रश्न प्रार्थनेबद्दलचा आहे. शास्त्रज्ञांना प्रार्थनेचे महत्त्व किती वाटते, याबद्दल तुला माहिती हवी आहे.गीतेने प्रार्थनेला खूप महत्त्व दिले आहे. शास्त्रज्ञांनादेखील प्रार्थनेचे महत्त्व किती वाटते, त्यांना वाटते की, प्रार्थना करून आपण आपले काम करू लागलाे म्हणजे फार फायदा हाेताे.
 
एखादे अवघड ऑपरेशन करण्यापूर्वी डाॅ्नटरलाेक मनाेमन प्रार्थना करीत असतात.Man the unknown हा विश्वविख्यात ग्रंथ लिहिणारे व नाेबेल प्राइझ मिळवणारे कॅरेल म्हणतातIt is only by way of prayer that man can create utmost energy. प्रार्थनेनेच मनुष्य जास्तीत जास्त श्नती निर्माण करू शकताे. तू राेज प्रार्थना करत जा.अंतरंगातील दिव्य श्नतीची प्रार्थना करून चांगले काम करत जा म्हणजे तुझ्या जीवननाैकेचा प्रवास सुखकारक हाेईल.काही विद्वान म्हणतात कीआत्मनंद, आत्मसाक्षात्कार, ईश्वराची कृपा, ईश्वराचा वशिला, ईश्वरी चमत्कार हे सारे थाेतांड आहे.त्यांना वाटते की- याेगाने शरीराला समताेल येऊनही शरीर निराेगी हाेईल, मनाला अल्हाद हाेईल. पण आत्म्याचे ज्ञान हाेते व त्यामुळे माणूस विदेही हाेताे ताे निसर्गनियमांच्या पलीकडे जाताे, त्याला ईश्वराचा खास वशिला मिळताे व ताे चमत्कार करू शकताे ही जी आत्मानंद, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान यांचेसंबंधी आख्यायिका आहे ती कल्पना असून भाेंदू साधूनी लाेकांना फसवण्यासाठी व आपल्या नादी लावण्यासाठी हा धंदा केला आहे.
 
काही लाेकांना साधू बनवून त्यांच्या ठिकाणी अलाैकिक सामर्थ्य असल्याचा जाे प्रचार करण्यात येताे ती शुद्ध लबाडी आहे... ईश्वर म्हणून काेणी अलाैलिक कर्तृत्वाचा माणूस नव्हे. वेदान्ताने ईश्वराला निर्गुण-निराकार म्हणणे आणि पाश्चात्त्य भाैतिकवाद्यांनी ईश्वर नाही म्हणणे यात मूलत: फरक नाही. जगात चमत्कार काहीही नाही. एखादा साधू लाेकांना भूरळ घालून आपला बडेजाव करू शकेल, पण ताे ईश्वराच्या वशिल्याने चमत्कार करू शकणार नाही. काही साधू चमत्कार करतात असे जे लाेक म्हणतात ते खाेट बाेलतात स्वत:ची फसवणूक करतात.... भ्नतीने अथवा ज्ञानाने ईश्वर प्राप्त हाेताे किंवा आत्मानंद हाेताे हे म्हणणे खाेटे आहे. ईश्वरप्राप्ती ही अश्नय गाेष्ट आहे-