तरुणसागरजी

    13-Feb-2023
Total Views |
 
 
 

Tarunsagarji 
धंदा काेणताही असाे, प्रत्येक धंद्यात पाप असतेच असते. पैसा येताना पाप घेऊन येताे. जसे की, समुद्र काही शुद्ध पाण्याने भरलेला नसताे. त्याला अस्वच्छ नदी-नाल्यांचे पाणीही सामावून घ्यावे लागते. अगदी याचप्रमाणे प्रामाणिकपणामुळे काही पेटी आणि तिजाेरी भरत नाही. हा पाेट मात्र जरूर भरते. शंभर रुपये कमावत असाल, तर पाच-दहा रुपये धर्म-पुण्यासाठी जरूर खर्च करावेत. आपल्या हाताने जे दान कराल, तेच तर तुमच्यासाेबत जाईल.बँकेत ठेवलेले काही साेबत येणार नाही.