पत्र तिसरे
2 स्त्री श्रेष्ठ का पुरुष? या प्रश्नाचे उत्तर देताना काही लाेक म्हणतात की पुरुष श्रेष्ठ तर काही लाेक म्हणतात की स्त्री श्रेष्ठ; पण माता श्रेष्ठ का पिता श्रेष्ठ या प्रश्नाचे उत्तर मात्र माता श्रेष्ठ असेच द्यावे लागेल. मातेची थाेरवी अशी आहे म्हणून साधूसंत विठाेबालादेखील विठाई माऊली असे म्हणतात.
3 अवनी याचा अर्थ भूमी असा आहे. अवनी याचा दुसरा अर्थ अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र नि म्हणजे निवारा.अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या आत्यंतिक गरजा आहेत.या गरजा भागवण्याची तरतूद न करता माणसाला तत्त्वज्ञान सांगणे म्हणजे भुकेल्या माणसाला पुस्तकातील अन्नाचे वर्णन वाचून दाखवण्यासारखे आहे.
4 मन हे भूमीप्रमाणे आहे. यामध्ये चांगल्या वाचनाचे बी पेरले म्हणजे चांगल्या विचारांची झाडे उगवतात व नंतर त्या झाडांना चांगल्या कृतीची फळे लागतात.असाे. बाकी मजकूर पुढील पत्रात. कळावे.तुझा राम पत्र चाैथे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. या खेपेस तू खूपच प्रश्न विचारले आहेस.
तुला माहीत असेल कीजग बदलण्याचे ध्येय डाेळ्यांसमाेर ठेवून ‘अतीत ध्यानधारणेचा’ पुरस्कार करणारे महर्षी महेश याेगी यांनी म्हटले की- ‘‘मी अयशस्वी झालाे.’’ अमेरिका-भारत असा प्रवास सुरू असाताना सिडने येथे ते थाेडा वेळ थांबले हाेते. विमानतळावर मृगाजिनावर बसून महर्षीनी पत्रकारांना मुलाखत दिली- ते म्हणाले- ‘‘1960 साली मी प्रवासाला निघालाे. 9 वर्षांत माझं ध्येय साध्य करण्याचे मी ठरविले हाेते. परंतु मी अयशस्वी झालाे हे मी आता जाणले आहे. अनेक लाेकांपाशी मी पाेहचू शकलाे, पण माझं ध्येय फसले आहे. पुढच्या वर्षी मी निर्जन जागी निघून जाणार आहे.’’ गीतेत सहाव्या अध्यायात ध्यानयाेगाचे वर्णन आहे.
ध्यानयाेगाने जग बदलता येते असा गीतेचा दावा नाही. गीतेचे असे सांगणे आहे कीध्यानाने पराकाष्ठेची शांती प्राप्त हाेते.शांती प्राप्त हाेण्याकरता मन ताब्यात येणे ही मुख्य बाब आहे. ध्यानामुळे तन ताब्यात येते. मन ताब्यात आल्यावर पराकाष्ठेची शांती प्राप्त हाेते.
ध्यान साधले म्हणजे आपणाला अनुभव येताे की- मन ताब्यात येऊ लागले आहे व त्यामुळे आपणाला शांती लागली आहे.काही लाेकांचे म्हणणे असे आहे कीध्यानामुळे कुंडलिनी जागृत हाेते व कुंडलिनी जागृत झाल्यावर मनुष्य पाण्यावरून चालू शकताे.तू व मी एकदा एका व्याख्यानास गेलाे हाेताे. व्याख्याते एक स्वामी हाेते. ध्यानामुळे कुंडलिनी कशी जागृत हाेते याचे सुंदर वर्णन त्यांनी केले.